महिलांची पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:37 AM2019-05-25T00:37:46+5:302019-05-25T00:38:02+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील कायम दुर्लक्षित असणारे शिरसाटे गाव. १२०० च्या जवळपास लोकसंख्या. गावात ६४ लाख रुपयांच्या खर्चाची नळ ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील कायम दुर्लक्षित असणारे शिरसाटे गाव. १२०० च्या जवळपास लोकसंख्या. गावात ६४ लाख रुपयांच्या खर्चाची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर असून, पाणीपुरवठा करणारी विहीरही खोदून तयार आहे.
तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी खोदलेली विहीर या योजनेसाठी नको म्हणून नवीन पदाधिकाऱ्यांनी
नव्या विहिरीसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. वाढत्या अंतर्गत राजकारणामुळे बांधलेल्या विहिरीला पाणी असूनही शिरसाटे ग्रामस्थांना पाण्यासाठी आटापिटा करावा लागतो आहे. अनेकांनी या वादात मध्यस्थी करूनही प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.
ग्रामस्थांसाठी पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला असून, टँकरचे पाणी विहिरीत टाकले जाते. गावापासून विहीर एक किमीवर आहे. महिलांना वर्षभर पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. उन्हाळ्यात महिला तर जास्तच मेटाकुटीला येतात.
टॅँकरवर भागते गावाची तहान
इगतपुरी तालुक्यातील डोंगराळ भागात शिरसाटे गाव आहे. काही वर्षांपूर्वी या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी ६४ लाख रु पये खर्चाची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. तत्कालीन सरपंच जनाबाई सदगीर यांनी सांजेगाव धरणाजवळ विहिरीसाठी जागा घेऊन स्वखर्चाने विहीर खोदली. या विहिरीला पुरेसा पाणीसाठा आहे. मधल्या काळात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. जुने पदाधिकारी जाऊन नव्या पदाधिकाºयांनी ग्रामपंचायतीत सत्ता संपादन केली. जुन्या पदाधिकाºयांनी केलेल्या कामाबाबत नव्या पदाधिकाºयांनी असमाधान दाखवून खोदलेली विहीर नाकारली व नव्याने विहीर खोदकाम सुरू करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले; मात्र या नव्या-जुन्याच्या वादामुळे ग्रामस्थ मात्र पाण्यासाठी व्याकूळ झाले आहेत. अनेकांनी या वादात केलेली मध्यस्थी निष्फळ ठरली आहे.
४शिरसाटेची भीषण पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाने
गावात टँकर सुरू केलेला आहे. गावापासून एक किमी दूर असलेल्या सार्वजनिक विहिरीत टॅँकरचे पाणी टाकले जाते. एक टँकर गावासाठी कमी पडत असल्याने महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पाण्याचा शोध घ्यावा लागतो. तहान भागविण्यासाठी सरकारी टँकरचा आधार घेतला जात असला तरी, या पाण्यामुळे गावकरी आजारी पडत आहेत, अशी माहिती काही ग्रामस्थांनी दिली. यामुळे या गावातील पाण्याचे संकट आता अधिकच भीषण होत चालले आहे. जनावरांच्या चाºयाचा प्रश्नदेखील गंभीर झाला आहे. पाण्याशिवाय माणसांनी व जनावरांनी जगायचे कसे व करायचे काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. शिरसाटे गावातील जनतेला भीषण दुष्काळाची दाहकता सोसावी
लागत आहे.