वणी आठ दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 09:49 PM2020-06-16T21:49:17+5:302020-06-17T00:18:30+5:30
वणी : येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने अत्यावश्यक सेवावगळता २३ जूनपर्यंत गावातील सर्व व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन व ग्रामपालिका सतर्क झाली आहे.

कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाच्या विविध अधिकाऱ्यांनी वणीला भेट देऊन योग्य त्या सूचना देऊन खबरदारीचे आदेश दिले आहेत. रुग्ण राहत असलेला परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून, सील करण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन, ग्रामपालिका व व्यावसायिक यांच्यात झालेल्या चर्चेतून वणी शहरातील व्यवसाय बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी आढाव यांनी दिली.
शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे, यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग अत्यंत महत्त्वाचे असून, त्याचे तंतोतंत पालन व्हावे तसेच विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांनी अत्यंत महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, एकमेकांच्या संपर्कात येऊ नये यासाठी गाव बंद ठेवण्यात आले
आहे.