वणी परिसराला झोडपले
By admin | Published: August 6, 2016 10:30 PM2016-08-06T22:30:07+5:302016-08-06T22:31:53+5:30
संततधार : नदीकाठच्या गावांना प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा
वणी : परिसरात मुसळधारेने पुन्हा जनजीवन विस्कळीत झाले असून, अजून जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शुक्रवारी रात्रीपासून वणी, कृष्णगाव, ओझरखेड, लखमापूर, परमोरी, वरखेडा, वलखेड, ओझे, कादवा कारखाना परिसर करंजवण, मावडी, तिसगाव, तळेगाव, औताडे, वाघेरा परिसर, मुळाणे, बाबापूर, संगमनेर, धरमबर्डा, भातोडे, चिडकापूर, गोलदरी, चामदरी, अहिवंतवाडी, अंबानेर, चौसाळे, हस्ते माळे, अस्वलीपाडा, जिरवाडे, पिंप्री, पांडाणे, पुणेगाव, कोल्हेर, खोरीपाडा, पिंगळवाडी, करंजखेड, सारसाळे, भनवड, करंजाळी, टाक्याचा पाडा कोशिंबे, टिटवे, वनारे, बाडगीचा पाडा, ननाशी या परिसरात मुसळधार पाऊस झाला नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सप्तशृंगगड परिसर व पायथ्याच्या भागातही जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. दुथडी भरून नद्या-नाले वाहत असून,
तालुक्यातील सहाही धरणाच्या साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.
पुणेगाव धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने ओझरखेड धरणात वेगाने जलसाठा वाढतो आहे. तहसील कार्यालयात अपत्कालीन परिस्थितीला सामोरे जावे लागण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)