वणी येथे चोरट्यांनी महिलेची पोत लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 09:47 PM2020-07-27T21:47:21+5:302020-07-28T00:30:17+5:30
वणी : शेतातील भुईमूग निंदण्यासाठी जानोरी शिवारात कार्गो गेट ते अक्र ाळे रस्त्यादरम्यान दुचाकीवर आलेल्या दोन संशयितांनी संगनमताने हातचलाखी करून महिलेची एक लाख वीस हजार रुपयांची सोन्याची पोत लांबविल्या प्रकरणी दोन संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दिंडोरी पोलिसांनी दाखल केला आहे.

अलका चंद्रकांत वाघ या शेतात पायी जात असताना त्यांच्या मागून दोन संशयित पल्सर मोटारसायकलवर आले. त्यांच्या पुढे जाऊन पुन्हा वळून वाघ यांच्यापाशी येऊन दुचाकी थांबविली व हात पुढे करा, असे सांगताच वाघ यांनी हात पुढे केले. शेतात गेल्यावर कागद उघडून पाहा असे सांगितले. वाघ यांनी या संशयितांनी सांगितल्याप्रमाणे कृती केली व कागद उघडताच त्यात सोन्याची पोत नव्हती. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दिंडोरी पोलिसात याबाबत तक्र ार करण्यात आली. संगनमताने फसवणुकीचा गुन्हा दोघांविरोधात दाखल करण्यात आला आहे.
---------------
चोरट्यांनी सॅनिटायझरसारखे काहीतरी अलका वाघ यांच्या हातावर टाकले व तोंडाला मास्क लावा आमचे साहेब येत आहेत, असे सांगितले. तसेच गळ्यातील पोत पिशवीत काढून ठेवा, असे बोलून संशयिताने खिशातून एक कागद काढला व या कागदात पोत ठेवतो असे सांगितले. त्यांच्या शब्दावर वाघ यांनी विश्वास ठेवला व तीस ग्रॅम वजनाची सोन्याचे मंगळसूत्र व ओम पान असलेली पोत संशयिताच्या हातात दिली. कागदात पोत ठेवण्याचे नाटक करत चोरट्याने गुंडाळलेला कागद पिशवीत टाकला.