वणीत कांदा ३९८१ रुपये क्विंटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 11:21 PM2020-09-19T23:21:47+5:302020-09-20T00:40:41+5:30
वणी : येथील उपबाजारात कांदद्याला ३९८१ रूपये दर मिळाल्याने उत्पादकांच्या आशा वाढल्या आहेत. आवक कमी झाली मात्र दरात तुलनात्मक तेजी झाल्याने आर्थिक प्रणालीत वाढ झाली आहे. शनिवारी वणी उपबाजारात कांद्याला ३९८१ रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला.
वणी : येथील उपबाजारात कांदद्याला ३९८१ रूपये दर मिळाल्याने उत्पादकांच्या आशा वाढल्या आहेत. आवक कमी झाली मात्र दरात तुलनात्मक तेजी झाल्याने आर्थिक प्रणालीत वाढ झाली आहे. शनिवारी वणी उपबाजारात कांद्याला ३९८१ रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. ३६०० किमान तर ३३२५ सरासरी असा प्रति क्विंटलचा दर मिळाला. गोल्टी कांदा २७८१ कमाल , २२०० किमान तर २६०० रुपये सरासरी आसा दर मिळाला. कांद्याचे दर सरकारच्या दृष्टीकोनातुन वाढल्याने निर्यातबंदी करण्याच्या निणर्यानंतर काहीशी अस्वस्थता उत्पादकांमधे होती. चार पैसे वाढीव मिळण्याच्या अपेक्षेला मर्यादा पडण्याचे चित्र दिसुन येत होते. सर्व स्तरावर या निणर्याला विरोध करण्यात आला होता.दरम्यान देशांतर्गत नाशिक जिल्ह्यातील टिकवणक्षमता व चवीला उजव्या असलेल्या कांद्याला मागणी कायम आहे, त्याचा सकारात्मक परिणाम दरावर झाला त्यमुळे उपबाजारात विक्रमी भाव कांद्याला मिळाला.