वणीत टमाटे दोन रूपये किलो, उत्पादक हवालदिल....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 02:51 PM2018-01-10T14:51:12+5:302018-01-10T14:51:28+5:30
वणी : परराज्यात घटलेली मागणी व स्थानिक ठिकाणी कमालीचे वाढलेले उत्पादन यामुळे टमाटयाचे दर कोसळले दोन ते चार रूपये प्रतिकिलो असा भाव मिळू लागल्याने उत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे.
वणी : परराज्यात घटलेली मागणी व स्थानिक ठिकाणी कमालीचे वाढलेले उत्पादन यामुळे टमाटयाचे दर कोसळले दोन ते चार रूपये प्रतिकिलो असा भाव मिळू लागल्याने उत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. कमीदरात टमाटा खरेदी करून मुंबईला घाऊक बाजारात विकण्यासाठी मुंबई भागातील व्यापाºयांनी रस दाखविल्याने उत्पादकांसमोर पर्याय उभा राहिला आहे. काही कालावधीपूर्वी प्रतवारी व दर्जा पाहून वीस ते पन्नास रु पये प्रतिकिलो असा दर उत्पादकांना मिळाला होता. परराज्यातील प्रमुख उत्पादन केंद्रावर टमाटा पिकाचे मोठे नुकसान झाल्याने जिह्यातील टमाटयाला मागणी वाढली होती, मात्र तेथे आता परिस्थिती पूर्वपदावर आल्याने मुबलक उत्पादन त्याठिकाणी सुरू आहे. त्या भागातील स्थानिक ठिकाणांची गरज भागवुन परराज्यात त्या भागातील टमाटयाने बाजारपेठा काबीज केल्या. त्यामुळे स्वाभाविकत: जिल्ह्यातील टमाटयांना मागणी राहिली नाही. त्याचा प्रतिकुल परिणाम होत टमाट्याचे दर कोसळले. सध्या दोन ते चार रूपये प्रतिकिलो असा दर प्रतवारी व दर्जानुसार मिळत असल्याची माहिती देण्यात आली.दरम्यान, बहुतांशी टमाटा कमी दरात खरेदी करून प्रतिदिन मुंबई येथे विक्र ीसाठी पाठविण्यात येत आहे तसेच गुजरात राज्यातही टमाटा विक्र ीसाठी जातो आहे. टमाटा सॉस बनविणाºया कंपन्यांनाही सध्याची स्थिती टमाटा खरेदीसाठी अनुकुल असल्याने आडत्याच्या माध्यमातुन अशा कंपन्या मोठ्या प्रमाणावर टमाटा खरेदी करीत आहे. अनेक आडत्यांनी स्पर्धात्मक वातावरणात हक्काचे ग्राहक म्हणून कंपन्यांना टमाटा विक्र ीची तयारी दाखविली असली तरी अनुभवी आडत्यांकडे कंपन्यांचा कल आहे. कोसळलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी विविध घटक सरसावले असताना तुलनात्मकरित्या उत्पादकांना कमी दर विक्र ीच्या वातावरणाला सामोरे जावे लागते आहे.