वणीत कोरोना पॉजिटिव्ह रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 09:36 PM2020-06-15T21:36:31+5:302020-06-16T00:03:53+5:30
वणी : येथील एका अपार्टमेंटमधे वास्तव्यास असलेल्या व्यक्ती तपासणीत पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्याने प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली.सदर व्यक्तीला मागील आठवड्यापासुन लक्षणाचा त्रास होत असल्याने एका खाजगी रूग्णालयात तीन दिवस उपचार करण्यात आले. मात्र लक्षणाची तिव्रता वाढल्याने जिल्हा रूग्णालयात शनिवारी तपासणी व उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले.
वणी : येथील एका अपार्टमेंटमधे वास्तव्यास असलेल्या व्यक्ती तपासणीत पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्याने प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली. सदर व्यक्तीला मागील आठवड्यापासुन लक्षणाचा त्रास होत असल्याने एका खाजगी रूग्णालयात तीन दिवस उपचार करण्यात आले. मात्र लक्षणाची तिव्रता वाढल्याने जिल्हा रूग्णालयात शनिवारी तपासणी व उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले.त्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी संकलीत करण्यात आले. आज सकाळच्या सुमारास त्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात पॉजीटिव्ह रिपोर्ट आल्याची माहीती आरोग्य विभागाने दिली. प्रशासकीय विभागाचे विविध अधिकारी यांनी वणी येथे धाव घेतली. दरम्यान, सदरचा इसम व त्यांची पत्नी सद्यस्थितीत जिल्हा रु ग्णालयात असुन या इसमावर उपचार सुरु आहेत तर दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड येथे असलेल्या कोविड सेंटरमधे त्या इसमाच्या कुटुंबातील तीन व्यक्ती ना कारंनटाईन करण्यात आले आहे.
घटनेची माहीती मिळताच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झरिवाळ यांनी वणी ग्रामीण रु ग्णालयास भेट दिली. तेव्हा अव्यवस्था व अस्वच्छता नजरेस पडताच त्यांनी आरोग्य विभागाची कानउघडणी केली व कार्यरत अधिकारी यांचेबाबत वरीष्ठ अधिकार्यांना सूचित करून कार्यप्रणालीत सुधारणा करण्याची समज दिली. ईमारत व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असुन सदर ईमारत कंटोनमेंट झोन जाहीर करण्यात आली आहे. तर १४ दिवस या इमारतीतील व्यक्ती ना कोरोनटाईन करण्यात आले असुन या भागात प्रवेशबंदीसाठी बॅरीकेटस् व पत्रे लावण्यात आले आहेत.खाजगी रु ग्णालयात सदर व्यक्ती उपचारासाठी दाखल होती ते डा?क्टर व त्यांचा स्टाफ का?रनटाईन करण्यात आला आहे.