रेल्वेने दुसऱ्या राज्यात जायचयं? मग आधी कोरोना टेस्ट करून घ्या...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:18 AM2021-07-07T04:18:20+5:302021-07-07T04:18:20+5:30

नाशिक : महाराष्ट्रातील कारेानाचा प्रकोप काहीसा कमी झाला असला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरेाना रुग्णसंख्या कायम आहे. त्यामुळे इतर ...

Want to go to another state by train? Then test the corona first ...! | रेल्वेने दुसऱ्या राज्यात जायचयं? मग आधी कोरोना टेस्ट करून घ्या...!

रेल्वेने दुसऱ्या राज्यात जायचयं? मग आधी कोरोना टेस्ट करून घ्या...!

Next

नाशिक : महाराष्ट्रातील कारेानाचा प्रकोप काहीसा कमी झाला असला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरेाना रुग्णसंख्या कायम आहे. त्यामुळे इतर राज्यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना काेरोना चाचणी करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे ज्यांना इतर राज्यांमध्ये जायचे आहे त्यांनी आरटीपीसीआर चाचणी करूनच प्रवासाला निघणे उचित ठरणार आहे.

ब्रेक द चेनअंतर्गत महाराष्ट्रातून अनेक रेल्वे गाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत तर गेल्या १ जूनपासून गाड्यांची संख्या देखील वाढविण्यात आलेली आहे. अशावेळी प्रवाशांची संख्यादेखील वाढलेली आहे. महाराष्ट्रातून इतर राज्यात जाण्यासाठी प्रवाशांची कोरेाना चाचणी तपासली जात आहे. अनेक प्रवाशांना याबाबतची माहिती नाही किंवा रेल्वे प्रशासनाकडूनही सांगितले जात नसल्याने इतर राज्यात पोहोचल्यावर प्रवाशांची अडवणूक होेते. अशी घटना टाळण्यासाठी प्रवाशांनी खबरदारी म्हणून आपली आरटीपीसीआर चाचणी करूनच प्रवासाला निघाले पाहिजे.

--इन्पो--

सध्या सुरू असलेल्या गाड्या

१) पंचवटी, राज्यराणी, मंगला, पंजाब मेल, राजधानी, हरिद्वार, मुंबई हावडा, कोलकाता मेल, गीतांजली, विदर्भ, दुरांतो, देवगिरी, तपोवन, पटना, जनता, महानगरी, काशी, गोरखपूर,गोहाटी, पुष्पक, पवन, गोदान, जनशताब्दी, कामयानी.

--इन्फो--

कोरोना टेस्ट, लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक

महाराष्ट्रातून परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांना कोरोना टेस्ट तसेच लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. राजस्थान, दिल्ली, केरळ, गुजरात, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यांकडून प्रवाशांकडून प्रमाणपत्रांची तपासणी केली जात आहे. रेल्वेस्थानकावरच प्रवाशांकडून लसीकरण तसेच निगेटिव्ह रिपोर्टची मागणी केली जात असल्याने प्रवाशांना दक्षता घ्यावी लागणार आहे.

Web Title: Want to go to another state by train? Then test the corona first ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.