युद्ध सोशल मीडियावर होत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 02:32 AM2019-03-01T02:32:09+5:302019-03-01T02:36:21+5:30
आज आमच्या घरातील सैनिकाला वीरमरण आले, उद्या दुसऱ्या कोणा सैनिकाला वीरगती प्राप्त होईल; पण माझी भारतवासीयांना एक विनंती आहे,
आज आमच्या घरातील सैनिकाला वीरमरण आले, उद्या दुसऱ्या कोणा सैनिकाला वीरगती प्राप्त होईल; पण माझी भारतवासीयांना एक विनंती आहे, मीडिया आणि सोशल मीडियावर युद्धाच्या गप्पा थांबवा. कारण युद्ध हे कोणाच्याही हिताचे नाही. सैन्य सक्षम आहे, त्यांना सल्ले देणे योग्य नाही, असे मी समजते. कृपा करून आशा पोस्ट टाकणाऱ्यांनो हे बंद करा. जर तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा आणि मग खरा अनुभव घ्या. आम्हाला युद्ध नकोय, युद्धात काय नुकसान होत, हे तुम्हाला माहिती नाही. आणखी निनाद जाता कामा नये. निनाद हा माझे जीवन होता आणि आहे. तो जरी शहीद झाला असला तरी तो आजही आमच्यात आहे. माझ्या तनामनात आहे. निनाद सारखा पती कधीच मिळणार नाही, मी त्याला कधीही विसरू शकत नाही. निनाद हा माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग होता, राहणार आणि कायम आहे.
- वीरपत्नी विजेता मांडवगणे, नाशिक.
(शहिद स्कॉर्डन लिडर निनाद मांडवगणे यांच्या पत्नी)