यंदा आषाढीवारी चुकणार असल्याने वारकरी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 07:31 PM2020-06-18T19:31:30+5:302020-06-18T19:32:35+5:30

नांदूरशिंगोटे : आषाढी एकादशी जवळ आली की वारकर्यांना वेध लागतात विठुरायाच्या पंढरीचे. आषाढीच्या मिहनाभर अगोदर सिन्नर तालुक्यातील हजारो वारकर्यांची ...

Warakari is upset as Ashadhiwari will be missed this year | यंदा आषाढीवारी चुकणार असल्याने वारकरी नाराज

कैलास महाराज तांबे

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनामुळे पंरपरा खंडित : घरी थांबूनच धार्मिक कार्यक्र म

नांदूरशिंगोटे : आषाढी एकादशी जवळ आली की वारकर्यांना वेध लागतात विठुरायाच्या पंढरीचे. आषाढीच्या मिहनाभर अगोदर सिन्नर तालुक्यातील हजारो वारकर्यांची पाऊले पंढरीच्या वाटेवर चालू लागतात. मात्र, यावर्षी कोरोनाने ही पावले थबकली आहे. एकादशी 15 दिवसावर असताना पंढरीची वाट सुनी सुनी लागत आहे. त्यामुळे अनेक जुन्या जाणत्या वारकर्यांनी घरीच आषाढी वारी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या पाशर््वभूमीवर वर्षानुवर्षे चालत आलेली पंढरपूर येथील आषाढी यात्रा यावर्षी थांबवण्यात आली. तालुक्यातील पिढ्यानिपढ्या जाणार्या वारकर्यांची परंपरा कोरोनामुळे खंडित झाली आहे. वारी चुकणार म्हणून अनेक वारकरी भाऊक झाले असल्याचे चित्र गावागावात भाविकांमध्ये दिसत आहेत. अनेक तपापासून ऊन, वारा व पावसाची तमा न करता व वय न पाहता पळत सुटणार्यांना पंढरीची वारी चुकल्याने गिहवरून येते आहे. पंढरीला जाण्याची आस त्यांच्या मनात लागलेली आहे. दरवर्षी तालुक्यातील पंधरा ते वीस हजार भाविक वेगवेगळ्या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. तसेच तालुक्यातील पाच ते सहा दिंड्या स्वतंत्रपणे आषाढी एकादशी जात असतात. दर मिहन्याच्या एकादशीला पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणार्या वारकर्यांची संख्याही मोठी आहे. सिन्नर तालुक्यातून जाणार्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा जात नसल्याने पालखी मार्गावरील टाळ मृदंगाचा व हरिनामाचा जयघोष दिसून आला नाही.
चौकट....
कोरोना महामारी ही देशावर एक नैसिर्गक आपत्ती आली असल्याने पंढरपूरची पायी वारी रद्द करण्यात आली आहे. गेल्या 45 वर्षापासून संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभाग असायचा. आयुष्यात पिहल्यांदाच आषाढी एकादशीच्या वारीला मुकावे लागले आहे. निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यात रथापुढे 3 नंबर आमच्या दिंडीचा असायचा. आषाढी एकादशी पर्यंत दररोज अभिषेक, पूजा, हरिपाठ आदी धार्मिक कार्यक्र म घरीच केले जात आहेत. घरीच राहून पांडुरंगाचे नामस्मरण केले जात आहे.
- एकनाथ महाराज गोळेसर.
चौकट....
सिन्नर तालुक्यातुन आषाढी वारीसाठी दरवर्षी हजारो भाविक पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होतात. तसेच काही वारकरी त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज व आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातही सहभागी होतात. पंरतु यावर्षी कोरोनाच्या पाश्वभूमीवर पायी दिंडी सोहळा बंद आहे. त्यामुळे वारकर्यांना सहभागी होता न आल्याने मनामध्ये दु:ख आहे. त्यामुळे यावर्षी घरी थांबूनच सर्व धार्मिक कार्यक्र म करणार आहेत.
- कैलास महाराज तांबे, अध्यक्ष, सिन्नर तालुका वारकरी मंडळ.

(फोटो १८ तांबे. १८गोळेसर)

Web Title: Warakari is upset as Ashadhiwari will be missed this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.