वारकऱ्यांची आषाढी झाली घरीच साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 12:24 AM2020-07-02T00:24:08+5:302020-07-02T00:31:58+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पंढरपूरला जाणाºया पायी दिंड्या रद्द झाल्याने वारकऱ्यांची आषाढी एकादशी घरीच साजरी झाली. यंदा विठ्ठल मंदिरांत केवळ पूजा व अभिषेक करण्यात आला. तसेच दरवर्षी शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागत. मात्र अनेक ठिकाणी मंदिरात दर्शनासाठी गदी करूनये आवाहन करण्यात आल्याने सर्वांना मंदिरांच्या बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले.
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पंढरपूरला जाणाºया पायी दिंड्या रद्द झाल्याने वारकऱ्यांची आषाढी एकादशी घरीच साजरी झाली. यंदा विठ्ठल मंदिरांत केवळ पूजा व अभिषेक करण्यात आला. तसेच दरवर्षी शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागत. मात्र अनेक ठिकाणी मंदिरात दर्शनासाठी गदी करूनये आवाहन करण्यात आल्याने सर्वांना मंदिरांच्या बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सर्वच सण-समारंभ आणि यात्रोत्सव रद्द झाले आहेत. त्यामुळे साहजिकच दरवर्षी मंदिरात भाविकांच्या गर्दीत रंगणारी आषाढी यंदा विठूनामाच्या गजराविना काहीशी सुनी-सुनी वाटत होती.
काही मंदिरात केवळ दहा-बारा भाविकांनाच मंदिराच्या सभामंडपात उभे राहून दर्शन घेता आले.
यंदा वारी चुकली रे हरी, अशी खंत अनेक वारकºयांनी व्यक्त केली. जुने नाशिक, पंचवटी, सिडको, इंदिरानगर, गंगापूररोड, कॉलेजरोड आदी ठिकाणाच्या मंदिरात वर्षी आषाढीला भजन-कीर्तन सोहळा रंगतो. यंदा मात्र केवळ अभिषेक आणि शोडषोपचार पूजा करण्यात आली. त्यामुळे दरवर्षी हरिनामात गजबजणारी मंदिरे आज मात्र सुनी-सुनी वाटत होती.
तर जुने नाशिकच्या काझीपुºयातील नामदेव मंदिर, मुरलीधर मंदिराशेजारील विठ्ठल मंदिर, काळाराम मंदिरानजीकचे विठ्ठल-रखुमाई मंदिर आणि कॉलेजरोडवरील विठ्ठल रखुमाई मंदिरातदेखील भाविकांना दुरूनच दर्शन घेता आले. दरम्यान, विठ्ठल मंदिरात दर्शनाला येणाºया भाविकांसाठी सॅनिटायझरचीही व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांना कुठल्याही प्रकारची बाधा होऊ नये, यासाठी सर्व दक्षता घेण्यात आली असल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले. दरम्यान, उपवासाठी फराळाचे पदार्थ आणि फळे घेण्यासाठी बाजारामध्ये, दुकांनात गर्दी दिसून आली.
(चौकट)
केवळ पूजाआर्चा