वारकऱ्यांसाठी भगूरहून औषधे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 00:28 IST2019-06-23T00:28:16+5:302019-06-23T00:28:45+5:30
आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून येथील दानशूर व्यक्ती व संस्था, संघटनांनी एकत्र येऊन सुमारे दीड लाख रुपयांचा औषध पुरवठा रवाना केला आहे.

वारकऱ्यांसाठी भगूरहून औषधे रवाना
भगूर : आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून येथील दानशूर व्यक्ती व संस्था, संघटनांनी एकत्र येऊन सुमारे दीड लाख रुपयांचा औषध पुरवठा रवाना केला आहे.
भगूर येथून त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आषाढी एकादशी यात्रेनिमित्त वारीसाठी निघालेल्या वारकरी, भाविकांना औषधोपचार मिळावा म्हणून शिवाजी चौकातून रुग्णवाहिका पाठविण्यात आली. विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पार्टी, शिवसेना व भगूर गावातील दानशूर व्यक्ती गेल्या सहा वर्षांपासून हा उपक्रम राबवित आहेत. आरोग्यसेवेचे उद्घाटन विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष एकनाथ शेटे, माजी नगरसेवक रंगनाथ करंजकर, मुख्याध्यापक रामदास आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मारुती मंदिर भजनी मंडळ व मुरलीधर मंदिर भजनी मंडळाचे ज्येष्ठ वारकरी विष्णूपंत करंजकर, शिवाजी मोजाड, देवीदास कुंवर, वारुंगसे महाराज, अशोक गिते, नामदेव मोजाड, जयवंत करंजकर, एकनाथ दिवटे, शांतीलाल मुंदडा, किसन झंवर, रामदास करंजकर, फकिरा बिडवई, कृष्णा शिरसाठ, चेतन बागडे, नीलेश हासे, मधुकर कापसे, संदीप वालझाडे, डॉ. मृत्युंजय कापसे, प्रताप गायकवाड, विशाल शिरसाट, नीलेश हेंबाडे आदी उपस्थित होते.