प्रभाग ३० मध्ये महिला इच्छुकांची संख्या मोठी

By admin | Published: November 14, 2016 12:58 AM2016-11-14T00:58:30+5:302016-11-14T01:21:17+5:30

उत्सुकता : सर्वांनाच मिळाले आश्वासन

In Ward 30, the number of women wanting big | प्रभाग ३० मध्ये महिला इच्छुकांची संख्या मोठी

प्रभाग ३० मध्ये महिला इच्छुकांची संख्या मोठी

Next

 इंदिरानगर : प्रभाग ३० मध्ये अ, ब, क, ड या चारही जागांवर महिलांना उमेदवारी करता येणार आहे. त्यामुळे भाजपा-शिवसेना या पक्षांमधील इच्छुकांच्या भाऊगर्दीत महिला जास्त आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेला उमेदवारांची शोधाशोध करावी लागणार आहे. सर्वांना शब्द दिला आहे कामास लागा म्हणून. त्यामुळे कोणास उमेदवारी मिळणार, कोण कामास लागणार आहे त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
प्रभाग ३० हा पूर्वीचा जुना प्रभाग ३८ असून यामधील फक्त वडाळागाव, प्रभाग ५३ मधील राजीवनगर, महारुद्र कॉलनी, किशोरनगर, पेठेनगर रस्ता, जाखडीनगर, राणेनगर तर प्रभाग ५४ चा चिंतामणी कॉलनी, श्रद्धाविहार कॉलनी, शिव कॉलनी, पांडवनगरीसह परिसर आला आहे. सध्या भाजपाकडून सर्वाधिक इच्छुक उमेदवार आहेत. यामध्ये पती नाही तर पत्नी अशी भूमिका सर्वांनीच घेतली आहे. त्यामुळे उमेदवारी देताना पक्षास आणि उमेदवारास अडचण निर्माण होणार आहे. भाजपाकडून विद्यमान नगरसेवक महिला, माजी नगरसेवक महिला, माजी नगरसेवक यांची पत्नी, पदाधिकारी महिला आदिंची संख्या जास्त आहे. तसेच शिवसेनेकडून विद्यमान नगरसेवक महिला, पदाधिकाऱ्यांची पत्नी, महिला पदाधिकाऱ्यांची संख्या जास्त आहे. तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेला उमेदवारासाठी शोधाशोध करावी लागणार आहे. कारण काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या एका माजी नगरसेवकाने शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच मनसेकडून एकमेव विद्यमान नगरसेवक महिलाच या प्रभागात आहे. प्रभाग ३० मध्ये राजीवनगर झोपडपट्टी, सावित्रीबाई झोपडपट्टी, अण्णा भाऊ साठेनगर यांसह वसाहती आहेत. वसाहती आणि झोपडपट्टीमधून इच्छुकांची संख्या बऱ्या प्रमाणात आहे. प्रभागाचे आरक्षण अ) अनुसूचित जमाती महिला, ब) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, क) सर्वसाधारण, ड) सर्वसाधारण असे झाले आहे. त्यामुळे दोन जागा तर महिलांसाठी राखीव आहेत.
दोन जागा सर्वसाधारण असल्याने त्याठिकाणीही महिला उमेदवारी करू शकतात. त्यामुळे चारही ठिकाणी महिला उमेदवार आणि दोन सर्वसाधारण जागेवर आयात उमेदवारांची वर्णी लागण्याची शक्यता टाळता येत नाही. त्यामुळेच प्रभाग ३० मध्ये इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी वाढणार आहे. (वार्ताहर)

Web Title: In Ward 30, the number of women wanting big

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.