प्रभाग समिती सभापती पाहणी दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 11:50 PM2020-10-27T23:50:56+5:302020-10-28T01:23:55+5:30
पंचवटी : शहरात स्वच्छतेसाठी नाशिक महापालिकेने ठेकेदार नियुक्त करत कंत्राटी स्वच्छता कामगार नियुक्त केले असतांना असताना नवरात्र व दसरा उत्सवानंतर गोदाघाटावर निर्माल्याचे खच पडून होते. पंचवटी प्रभाग सभापती शितल माळोदे यांनी मंगळवारी गोदाघाटावर पाहणी दौरा करत संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना परिसर तत्काळ स्वच्छता करण्याचे आदेश दिले.

नाशिक महापालिकेने स्वच्छता अभियान स्पर्धेत चमकदार कामगिरी केली स्वच्छ स्मार्ट सिटी म्हणून पहिला क्रमांक पटकावला. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेने ठेकेदाराला स्वछतेचे कंत्राट देत कामगार नियुक्त केले. रामकुंड, गोदाघाट परिसरात मोठ्या स्वच्छता कामगार नेमले आहे. सण उत्सव पार्श्वभूमीवर भाविकांची गोदाघाटावर येजा सुरू असते.
धार्मिक नगरी असल्याने स्वच्छता राखणे गरजेचे आहे. घट विसर्जन करण्यासाठी नागरिकांनी गोदाघाट परिसरात निर्माल्य टाकले हे खच पडून असल्याने, रामकुंडासह जुने भाजी बाजार पटांगण, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण भागात अस्वच्छता निर्माण झाली होती. मंगळवारी प्रभाग सभापती माळोदे यांनी गोदाघाटावर पाहणी दौरा केला असता सदर अस्वच्छतेचे चित्र दिसून आल्यानंतर माळोदे यांनी संबंधित विभागाला तत्काळ परिसर स्वच्छतेचे आदेश दिले.