एका प्रस्तावासाठी प्रभाग समितीची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:49 AM2018-01-30T00:49:43+5:302018-01-30T00:49:59+5:30
महापालिका प्रभाग समित्यांची दरमहा एक सभा होत असते. मात्र, या प्रभाग समित्यांवरही प्रस्तावांची वानवा दिसून येत असल्याचे चित्र आहे. सोमवारी (दि.२९) झालेल्या पूर्व प्रभाग समितीच्या सभेत अवघ्या एका विषयासाठी प्रभाग समितीची सभा बोलाविण्यात आली आणि अन्य विषयांवरच सदस्यांनी आपली ४० मिनिटे खर्च केली. दरम्यान, सभेत अतिक्रमण आणि स्वच्छताविषयक प्रश्नी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
इंदिरानगर : महापालिका प्रभाग समित्यांची दरमहा एक सभा होत असते. मात्र, या प्रभाग समित्यांवरही प्रस्तावांची वानवा दिसून येत असल्याचे चित्र आहे. सोमवारी (दि.२९) झालेल्या पूर्व प्रभाग समितीच्या सभेत अवघ्या एका विषयासाठी प्रभाग समितीची सभा बोलाविण्यात आली आणि अन्य विषयांवरच सदस्यांनी आपली ४० मिनिटे खर्च केली. दरम्यान, सभेत अतिक्रमण आणि स्वच्छताविषयक प्रश्नी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. महिन्यातून एकदा प्रभाग समित्यांची सभा होत असते आणि पाच लाखांच्या आतील विकासकामांचे प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार प्रभाग समित्यांना आहेत. महिनाभरातील प्रस्ताव सभेत ठेवणे अपेक्षित आहे. परंतु, सोमवारी झालेल्या पूर्व प्रभाग समितीच्या सभेत अवघा एकच प्रस्ताव विषयपत्रिकेवर होता. त्यामुळे, सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले. प्रभाग ३० मध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर सदस्यांनी अतिक्रमण आणि स्वच्छताविषयक प्रश्नी प्रशासनाला धारेवर धरले. सतीश सोनवणे यांनी प्रभाग ३० मधील राजीवनगर झोपडपट्टीलगतच्या शंभर फुटी रस्त्याच्या दोन्ही बाजूचे पदपथ अतिक्रमणात हरविले असल्याची तक्रार केली, तसेच उद्यानांची देखभाल करणाºया संस्थांकडून देखभाल होत नसल्याचेही निदर्शनास आणून दिले. स्वच्छ सर्वेक्षणाच्या निमित्ताने झालेली स्वच्छता कायमस्वरूपी ठेवण्याची अपेक्षा अॅड. श्याम बडोदे यांनी व्यक्त केली. श्रद्धा विहार रो-हाउसच्या कार्नरला असलेली पडीत धोकादायक विहीर कचराकुंडी बनल्याचे सांगत सहा मीटर रस्त्यावर अनधिकृत सर्व्हिस स्टेशन सुरू असल्याची तक्रार केली. श्यामला दीक्षित यांनी सांगितले, सुचितानगरमध्ये स्वच्छता कर्मचारी फिरकतच नाहीत. जॉगिंग ट्रॅक येथील एक धार्मिक स्थळ हटविण्यात आले परंतु, त्याची जागा गॅरेजधारकांनी घेतल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. स्वच्छता कर्मचाºयांच्या अरेरावीबद्दलही सुषमा पगारे व दीक्षित यांनी संताप व्यक्त केला. प्रभागात अनधिकृतपणे शेड उभारत व्यवसाय केले जात असल्याचे अजिंक्य साने यांनी सांगितले. प्रभाग २३ मधील उद्यानाची देखभालीअभावी दयनीय स्थिती असल्याची तक्रार प्रशांत जाधव यांनी केली.
स्वीकृत सदस्यांचा सहभाग
प्रभाग समित्यांच्या सभांना फारसे प्रस्ताव नसतात आणि बºयाचदा प्रमुख अधिकारीही उपस्थित नसतात. त्यामुळे, प्रभागच्या सभांना सदस्यही गांभीर्याने घेत नाहीत. बºयाच प्रभाग सभांना सदस्यांची गैरहजेरी असते. सोमवारी झालेल्या पूर्व प्रभाग समितीच्या सभेला मागील महिन्यात स्वीकृत म्हणून नियुक्त झालेले अजिंक्य साने, प्रशांत जाधव आणि श्यामला दीक्षित यांनी हजेरी लावली आणि चर्चेत सहभागही घेतला.