निर्बंधाच्या अंमलबजावणीसाठी मालेगाव मनपाचे प्रभागनिहाय पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:15 AM2021-05-14T04:15:37+5:302021-05-14T04:15:37+5:30
निर्देशाची अंमलबजावणी करण्यासाठी चारही प्रभागनिहाय हेल्पलाइन क्रमांक सुरू करणे, किराणा दुकाने, बेकरी, मिठाई व इतर ...
निर्देशाची अंमलबजावणी करण्यासाठी चारही प्रभागनिहाय हेल्पलाइन क्रमांक सुरू करणे, किराणा दुकाने, बेकरी, मिठाई व इतर दुकाने तसेच पाळीव प्राण्याच्या जीवनावश्यक बाबींची दुकाने सकाळी ७ ते दुपारी १२ या कालावधीत केवळ घरपोच सेवा देण्यासाठी सुरू राहतील. वॉर्डनिहाय किराणा दुकाने, बेकरी, मिठाई व दुकाने यांची यादी नाव, संचालक नाव, पत्ता व संर्पक नंबरसह तयार करणे, माहितीसाठी प्रसिद्ध करणे, घरपोच सेवा पुरविणारे कामगार यांच्याकडे ग्राहकांच्या घरी जाताना बिल व संबंधित ओळखपत्र व निगेटिव्ह चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहील, वॉर्डनिहाय दूध संकलन केंद्रे यांची यादी दुकान नाव, संचालक नाव, पत्ता व संर्पक नंबरसह तयार करणे, हॉटले, रेस्टॉरंट, खनावळ, मद्यविक्री केंद्र यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी ७ ते दुपारी १२ व सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत सुरू राहील. सदर ठिकाणी ग्राहक आढळून आल्यास संबंधित आस्थापनेवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. भाजी मार्केट पूर्णत: बंद ठेवून कडेला सुरक्षित अंतरावर आखणी करून देऊन सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळात भाजी, फळेविक्री करण्यासाठी जागा निश्चित करून देण्याची जबाबदारी प्रभाग अधिकाऱ्यांवर राहील. फिरत्या हातगाडीवरून वरील वेळेतच भाजीपाला व फळे विक्रीकरण्यास परवानगी राहील, अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० व्यक्ती व त्यानंतरच्या विधीसाठी जास्तीत जास्त १५ व्यक्तींइतकी उपस्थितीची मर्यादा राहील. चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव करमणूक व्यवसाय नाटयगृह, कलाकेंद्र, प्रेक्षकगृहे, सभागृहे संपूर्णत: बंद राहतील., पूर्णत: ऑनलाइन असलेल्या सेवा सुरू राहतील, अशा सूचना आयुक्त गोसावी यांनी दिले आहेत.