वऱ्हाडाचा ट्रक उलटून १८ जखमी

By admin | Published: May 12, 2017 02:02 AM2017-05-12T02:02:25+5:302017-05-12T02:03:36+5:30

नाशिकरोड : नाशिक तालुक्यातील शिलापूर येथून लग्न समारंभ आटोपून हिंगणवेढे येथे परतणाऱ्या वऱ्हाडींचा टेम्पो गुरुवारी दुपारी सव्वा वाजता उलटल्याने १८ जखमी झाले आहेत

Wardha's truck collapses and injures 18 | वऱ्हाडाचा ट्रक उलटून १८ जखमी

वऱ्हाडाचा ट्रक उलटून १८ जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : नाशिक तालुक्यातील शिलापूर येथून लग्न समारंभ आटोपून हिंगणवेढे येथे परतणाऱ्या वऱ्हाडींचा टेम्पो गुरुवारी दुपारी सव्वा वाजता उलटल्याने १८ जखमी झाले आहेत. जखमींवर बिटको रुग्णालयात उपचार सुरू असून यामध्ये चौघा लहान मुला-मुलींचा समावेश आहे.
नाशिक तालुक्यातील हिंगणवेढे येथील विष्णू अशोक धात्रक व परळी जवळील सांडगाव येथील जयश्री सुदाम घुटे यांचा गुरुवारी दुपारी शिलापूर गावात लग्न समारंभ होता. लग्न समारंभ व जेवण आटोपल्यानंतर हिंगणवेढ्याचे वऱ्हाडी यांना घेऊन टेम्पोचालक (एमएच १२ एफए ८१४०) हा एकलहऱ्याजवळील गंगापाडळी येथून हिंगणवेढे येथे येत होता.
दुपारी १.१५ वाजेच्या सुमारास हिंगणवेढे गावाच्या एक किलोमीटर पहिले नागमोडी रस्त्यावर रस्ता ओलांडणाऱ्या मुलाला वाचविण्याच्या बेतात अचानक करकचून ब्रेक मारल्याने टेम्पो पलटी झाला.
टेम्पो पलटी झाल्यानंतर आजूबाजूचे रहिवासी, येणारे-जाणारे वाहनधारक यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना टेम्पोमधून बाहेर काढले. त्यानंतर तीन-चार गाड्यांमधून जखमींना मनपाच्या बिटको रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले.
टेम्पो उलटल्याने सुमन सोनवणे (३८), अलका पवार (४८), कमळाबाई पवार (५८), मीरा मोरे (४५), राधाकृष्ण पवार (२८), बाबुजी धात्रक (६५), योगेश मोरे (१८), करिना पवार (११), कमळाबाई विंचू (६०), भागाबाई मोरे (६५), निवृत्ती वाघ (७०), कारभारी धात्रक (७०), दीपक खेताडे (१८) या १३ जणांना जास्त मार लागल्याने बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अर्जुन पवार (१२), गंगू पवार (४३), जयश्री सोनवणे (१७), सुधीर कापसे (११), मंगल पवार (१२) या पाच जणांना किरकोळ मार लागल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले.
रुग्णालयात सामाजिक कार्यकर्ते जगदीश पवार, भाजपाचे बाजीराव भागवत, शांताराम घंटे, नगरसेवक सीमा ताजणे, पंडित आवारे, अंबादास पगारे आदिंनी रुग्णालयात अपघात ग्रस्त जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देत नातेवाइकांना धीर दिला.

Web Title: Wardha's truck collapses and injures 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.