व्यसनमुक्तीसाठी सरसावले वारकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 22:53 IST2018-12-09T22:52:03+5:302018-12-09T22:53:38+5:30
घोटी : व्यसनमुक्ती, जनजागृती, समाजसेवा, राष्ट्रसेवा याबरोबरच वारकरी संप्रदायाच्या सर्वांगीण विचारांचा प्रसार आणि प्रचार करून युवा शक्तीला संघटित स्वरूप देण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील वारकरी एकटवले आहेत. तालुक्यातील गावा गावात प्रत्येक चतुर्थीला वारकरी साधकांकडून हरिपाठ आणि कीर्तनाचा कार्यक्र म घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. शुभारंभाचा कार्यक्र म घेण्याचा विडा टाके घोटी ग्रामस्थांनी उचलला.

इगतपुरी तालुक्यातील गावांत प्रत्येक चतुर्थीला हरिपाठ, कीर्तन, जनजागरण कार्यक्र म करण्याचा संकल्प वारकऱ्यांनी केला. यावेळी प्रथम कार्यक्र माचा विडा उचलताना टाके घोटीचे वारकरी आणि पदाधिकारी.
घोटी : व्यसनमुक्ती, जनजागृती, समाजसेवा, राष्ट्रसेवा याबरोबरच वारकरी संप्रदायाच्या सर्वांगीण विचारांचा प्रसार आणि प्रचार करून युवा शक्तीला संघटित स्वरूप देण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील वारकरी एकटवले आहेत. तालुक्यातील गावा गावात प्रत्येक चतुर्थीला वारकरी साधकांकडून हरिपाठ आणि कीर्तनाचा कार्यक्र म घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. शुभारंभाचा कार्यक्र म घेण्याचा विडा टाके घोटी ग्रामस्थांनी उचलला.
घोटी येथील आगरी सेना मंगल कार्यालयात इगतपुरी तालुक्यातील ३०० वारकरी साधकांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. इगतपुरी तालुक्यात १३१ महसुली गावे आणि अनेक वाड्या आहेत. या प्रत्येक ठिकाणी दर महीन्याच्या चतुर्थीला हरिपाठ कीर्तन कार्यक्र म घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
हरिनामाचा प्रसार, संतांच्या साहित्याविषयी जनजागृती, व्यसनमुक्ती, तरु णांचे संघटन, शासकीय योजना, स्वच्छता आणि आरोग्याची जनजागृती या कार्यक्र मातून करण्यात येणार आहे. या उपक्र माचे अनेक गावातील साधकांनी स्वागत केले. कार्यक्र माचा शुभारंभ मंगळवारी (दि.२५) करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी टाके घोटी येथील वारकरी साधकांनी पहिल्या कार्यक्र माची जबाबदारी स्वीकारली. कार्यक्र माचे संपूर्ण नियोजन करण्याचा संकल्प टाके घोटी ग्रामस्थांनी केला. उपक्र माला तालुक्यातील सर्व वारकरी साधकांनी उपस्थित राहावे असे आवाहन टाके घोटी येथील चिंधूआप्पा महाराज आडोळे यांनी केले.
याप्रसंगी माधव महाराज दुभाषे, स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय महाराज चव्हाण, मधुकरबुवा भागडे, देवराम मराडे, जे.के. मानवडे, चिंधूआप्पा आडोळे, जगन शेलार, रवि महाराज आडोळे, मनोहर दुभाषे, समाधान महाराज भगत, निवृत्ती भागडे आदींसह तालुक्यातील ३०० वारकरी उपस्थित होते.