समाज मंदिराच्या भिंतीवर रेखाटली वारली संस्कृती चित्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 03:41 PM2020-09-09T15:41:29+5:302020-09-09T15:45:15+5:30
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील आखरपाट वस्ती येथे ग्रामपंचायतीने बांधलेल्या समाज मंदिराच्या भिंतीवर एका मजुरी करणाऱ्या कामगाराने प्रसिद्ध आदिवासी संस्कृती, कला जपण्याच्यादृष्टीने आदिवासी वारली सांस्कृततील चित्रे.
अशोक केंग
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील आखरपाट वस्ती येथे ग्रामपंचायतीने बांधलेल्या समाज मंदिराच्या भिंतीवर एका मजुरी करणाऱ्या कामगाराने प्रसिद्ध आदिवासी संस्कृती, कला जपण्याच्यादृष्टीने आदिवासी वारली सांस्कृततील चित्रे.
जानोरी ग्रामपंचायतीने आखरपाट या वस्तीवर आदिवासी समाजासाठी समाज मंदिर बांधून देण्यात आले आहे. या आखरपाट वस्तीवरील आदिवासी मुलांनी ग्रामपंचायतीने दिलेल्या समाज मंदिराला आपल्या खर्चाने रंग दिला. तसेच येथील सातवी शिकलेला व मजुरी करणारा युवक शंकर भोंडवे याने मिळेल त्या वेळात तसेच रात्रीच्या वेळात या समाज मंदिरातील भिंतीवर तासं तास उभा राहून आदिवासी समाजाची संस्कृती कला जपावी म्हणून आदिवासी वारली संस्कृतीची चित्रे काढत आहे. हे चित्रे बघितल्यावर असे वाटते ती हाताने काढली नसून छापली आहेत.
या चित्रामध्ये भोंडवे याने पक्षी, प्राणी, जंगली प्राणी, झाडे, झोपड्या घरे, नदी, सूर्य, चंद्र, घरात वापरणाºया वस्तू, डोंगर, शेती करणारे मजूर, शाळेत जाणारी मुलं, बैलगाडी असे अनेक प्रकारचे चित्र या युवकाने हाताने काढले आहे.
प्रतिक्रि या...
मला पहिल्यापासूनच चित्र काढण्याची आवड आहे घरची परिस्थिती नाजूक असल्याने मला शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे मजुरी करावी लागते. मजुरी करूनही आमच्या समाजाची कला जपावी म्हणून मी हे आदिवासी वारली संस्कृती चित्रे काढत आहे.
- शंकर भोंडवे, चित्रकार.
प्रतिक्रि या...
शंकर भोंडवे याला पहिल्यापासूनच चित्रकलेची आवड आहे. त्यानेच आम्हाला सुचवले की आपण आदिवासी वारली सांस्कृतिक चित्रे या समाज मंदिराच्या भिंतीवर काढू. सर्वांनी त्याला पसंती दशर््विली. व समाजाला ही ते मान्य झाल्याने व सर्वांनी त्याला मदत करण्याचे ठरवल, आणि अखेर ही वारली चित्रे सगाज मंदिराच्या भिंतीवर साकारली गेली.
- सुरेश साहाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य. (फोटश्े ०९ जानोरी,१)