अवैध व्यवसायावर कारवाईच्या मागणीसाठी रणरागिणी सरसावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 09:55 PM2020-03-10T21:55:51+5:302020-03-10T21:56:57+5:30
वणी : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथे अवैध दारू, जुगार हे व्यवसाय सर्रासपणे सूुरू आहेत. या अवैध धंद्यांना आळा घालावा या मागणीसाठी वरखेडा येथील ग्रामसभेत अनेक वेळा ठराव करण्यात आले, तसेच चार दिवसांपूर्वी येथील महिलांनी तहसीलदार कैलास पवार यांना निवेदनदेखील दिले होते. मात्र या निवेदनाकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने त्यानंतरही गावात सर्रास अवैध धंदे चालूच असल्याने येथील महिला आणि नागरिकांमध्ये संबंधित विभागाबाबत प्रचंड संताप निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथे अवैध दारू, जुगार हे व्यवसाय सर्रासपणे सूुरू आहेत. या अवैध धंद्यांना आळा घालावा या मागणीसाठी वरखेडा येथील ग्रामसभेत अनेक वेळा ठराव करण्यात आले, तसेच चार दिवसांपूर्वी येथील महिलांनी तहसीलदार कैलास पवार यांना निवेदनदेखील दिले होते. मात्र या निवेदनाकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने त्यानंतरही गावात सर्रास अवैध धंदे
चालूच असल्याने येथील महिला आणि नागरिकांमध्ये संबंधित विभागाबाबत प्रचंड संताप निर्माण झाला आहे.
वरखेडा ग्रामपंचायतीमार्फत नाशिक पोलीस ग्रामीण यांना वरखेडा येथील अवैध धंदे याबाबत वारंवार ग्रामसभेत ठराव करून आणि संबंधित विभागांना निवेदन देऊनही वरखेड येथील अवैध धंदे बंद होत नसल्याने येथील महिलांनी
स्वत: रस्त्यावर उतरून अवैध धंद्यांना लगाम घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.सोमवारी (दि. ९) दुपारी येथील महिलांनी वरखेडा येथील अवैध दारू अड्यावर छापा टाकून दारूचे बॉक्स जप्त केले. तसेच सायंकाळच्या सुमारास देखील येथील महिला एकत्र येऊन गावात जेथे-जेथे अवैध मध्य विक्र ी केली जाते तेथे जाऊन ते धंदे बंद करत केले. प्रशासन लक्ष देत नसल्याने महिलांनाच ही कारवाई करावी लागत असल्याने येथील महिला संबंधित पोलीस प्रशासन आणि महसूल विभागावर संताप व्यक्त करत आहे.