सतर्कतेचा इशारा : हवामान खात्याच्या अंदाजामुळे चिंता वाढली जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 01:49 AM2019-11-05T01:49:44+5:302019-11-05T01:49:56+5:30
नाशिक : आॅक्टोबरमध्ये कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाचा येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांसह प्रशासकीय यंत्रणेची देखील चिंता वाढली आहे.
नाशिक : आॅक्टोबरमध्ये कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाचा येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांसह प्रशासकीय यंत्रणेची देखील चिंता वाढली आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या तर शेतकऱ्यांना उरल्यासुरल्या पिकांची काळजी घेण्याबाबतचे आवाहन केले आहे. आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणेला देखील सज्जतेच्या सूचना दिलेल्या आहेत.
जून-जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेला महापूर आणि त्यामुळे पिकांचे झालेले नुकसान यातून शेतकरी सावरत नाही तोच आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्'ातील साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्'ातील जवळपास सर्वच पिके नष्ट झाली आहे, तर द्राक्षांची मोठी हानी झाल्याने हंगामातील द्राक्ष उत्पादनदेखील कमी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. हाती आलेले तसेच शेतातील उभे पीक वाहून गेल्यामुळे ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीची झळ कायम असताना जिल्ह्यात येत्या ६ ते ८ तारखेदरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकºयांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे नाशिक जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत यापूर्वीच परतीच्या पावसाने नुकसान केले असताना आता अतिवृष्टीचा धोका निर्माण झालेला आहे. विशेषत: डोंगराळ भागात असलेल्या तालुक्यांना या अतिवृष्टीचा फटका बसण्याची शक्यता असल्याने यापूर्वी अवकाळी पाऊस झालेल्या तालुक्यांची हानी होण्याची शक्यता आहे.
नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाºया जिल्हा प्रशासनाला यंदा जूनपासूनच लहरी पावसामुळे धावपळ करावी लागत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर लागलीच अवकाळी पावसाचे संकट आल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा आता आपत्ती निवारण आणि पंचनामन्याच्या कामाला जुंपली आहे.
हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानंतर जिल्हा यंत्रणा सतर्क झाली असून, जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. विशेषत: शेतकºयांचा उरलासुरला शेतमाल वाचवण्यिाचे मोठे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शेतकºयांना सावध राहण्याचा सल्ला देण्याबरोबर पिके सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले आहे.