सातपूरला ध्वनिक्षेपकाद्वारे सावधानतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:02 AM2018-07-17T01:02:00+5:302018-07-17T01:02:17+5:30

संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन वित्तहानी किंवा मनुष्यहानी होऊ नये याची दक्षता घ्यावी म्हणून अग्निशमन दलाच्या जवानांनी नासर्डी आणि गोदावरी नदी काठावरील रहिवाश्यांना ध्वनिक्षेपकाद्वारे सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे.

Warning signal in Satpur | सातपूरला ध्वनिक्षेपकाद्वारे सावधानतेचा इशारा

सातपूरला ध्वनिक्षेपकाद्वारे सावधानतेचा इशारा

Next

सातपूर : संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन वित्तहानी किंवा मनुष्यहानी होऊ नये याची दक्षता घ्यावी म्हणून अग्निशमन दलाच्या जवानांनी नासर्डी आणि गोदावरी नदी काठावरील रहिवाश्यांना ध्वनिक्षेपकाद्वारे सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे गोदावरी आणि नासर्डी नदीला पूर आलेला आहे, तर गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने नदी काठावरील रहिवाश्यांना सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे. संभाव्य पूर परिस्थिती पाहता नागरिकांनी सावधानता बाळगून वेळीच स्थलांतरित व्हावे, असाही इशारा दिला जात आहे. तसेच पूर पाहण्यासाठी नदीकाठी जाणाऱ्या नागरिकांनीदेखील काळजी घ्यावी. संभाव्य पुरामुळे वित्तहानी टाळावी. घराबाहेर पडू नये, असेही आवाहन करण्यात येत आहे. सातपूर अग्निशमन केंद्राच्या वतीने दर दोन तासांनी गोदावरी नदी काठावरील सोमेश्वर ते आसाराम पूल आणि नासर्डी नदीकाठावरील पिंपळगाव बहुला ते आयटीआय पूल दरम्यान ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन करून सावधानतेचा इशारा दिला जात आहे.

Web Title: Warning signal in Satpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.