कामगार कल्याण मंडळाच्या नाट्य स्पर्धेत ‘वारूळ’ प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:44 AM2019-12-31T00:44:31+5:302019-12-31T00:44:52+5:30
कामगार कल्याण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्राथमिक नाट्य स्पर्धेत सिन्नरच्या कामगार कल्याण केंद्राने सादर केलेल्या ‘वारूळ’ नाटकाने प्रथम क्र मांक पटकावला,
सातपूर : कामगार कल्याण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्राथमिक नाट्य स्पर्धेत सिन्नरच्या कामगार कल्याण केंद्राने सादर केलेल्या ‘वारूळ’ नाटकाने प्रथम क्र मांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक ललित कलाभवन सिडको केंद्राने सादर केलेल्या ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या नाटकाने आणि दीपनगर कामगार केंद्राने सादर केलेल्या ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ नाटकाने तृतीय क्र मांक पटकावला. या तीनही नाटकांची राज्यनाट्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
परशुराम सायखेडकर नाट्यगृहात १० ते २७ डिसेंबर दरम्यान नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या नाट्य महोत्सवात नाशिक विभागातून तेरा संघ सहभागी झाले होते. परीक्षक म्हणून राजेश जाधव, हरीश जाधव, भाग्यश्री काळे यांनी काम पाहिले. पारितोषिक वितरण समारंभ सातपूर येथील कामगार कल्याण भवनात सोमवारी (दि.३०) पार पडला. अध्यक्षस्थानी अभिनेत्री पल्लवी ओढरकर होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून रंगकर्मी राजा पाटेकर, रविकिरण मोरे आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
प्रास्ताविक सहायक कल्याण आयुक्त सयाजीराव पाटील यांनी केले. सूत्रसंचालन केंद्रप्रमुख राजेंद्र नांद्रे यांनी केले. स्वागत कल्याण निरीक्षक शशिकांत पाटोळे यांनी केले. कल्याण निरीक्षक अजय निकम यांनी आभार मानले.
पुरस्कारार्थी असे...
उत्कृष्ट अभिनय (पुरु ष) : प्रथम विक्र म गवांदे, द्वितीय रवींद्र ढवळे, तृतीय अनिल कोष्टी. उत्कृष्ट अभिनय (महिला):- प्रथम स्वराली गर्गे, द्वितीय प्राजक्ता प्रभाकर, तृतीय पूनम देशमुख. उत्कृष्ट दिग्दर्शन :- प्रथम विक्र म गवांदे, द्वितीय रवींद्र ढवळे, तृतीय अनिल कोष्टी. उत्कृष्ट नेपथ्य :- प्रथम किरण भोईर, द्वितीय राजेंद्र जाधव, तृतीय गणेश सोनवणे. उत्कृष्ट पार्श्वसंगीत:- अंकिता मुसळे, रोहित सरोदे, अमोल काबरा. उत्कृष्ट प्रकाश योजना : रवी रहाणे, माणिनी कंसारा. उत्कृष्ट नाट्यलेखन - शरद भालेराव.