मृत व्यक्ती मद्यपान करीत होती की धूम्रपान?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 11:56 PM2017-10-02T23:56:58+5:302017-10-02T23:57:06+5:30

नाशिक : मृत व्यक्तीला सिगारेट, बिडी किंवा तत्सम पदार्थांचे व्यसन होते का, किती वर्षे... दारू किंवा उत्तेजक पदार्थांचे होते काय... महापालिकेच्या वतीने मृत्यूच्या दाखल्यासाठी थेट अमरधाममध्येच विचारली जाणारी माहिती चकित करणारी आहेच, परंतु संतापही वाढविणारी ठरत आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी आणल्यानंतर अशी माहिती घेऊन महापालिका काय साध्य करणार की, मृत्यू पश्चात व्यसनमुक्तीचे महत्त्व सांगणार, असा प्रतिप्रश्न केला जात आहे.

 Was the dead person drinking or smoking? | मृत व्यक्ती मद्यपान करीत होती की धूम्रपान?

मृत व्यक्ती मद्यपान करीत होती की धूम्रपान?

Next

नाशिक : मृत व्यक्तीला सिगारेट, बिडी किंवा तत्सम पदार्थांचे व्यसन होते का, किती वर्षे... दारू किंवा उत्तेजक पदार्थांचे होते काय... महापालिकेच्या वतीने मृत्यूच्या दाखल्यासाठी थेट अमरधाममध्येच विचारली जाणारी माहिती चकित करणारी आहेच, परंतु संतापही वाढविणारी ठरत आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी आणल्यानंतर अशी माहिती घेऊन महापालिका काय साध्य करणार की, मृत्यू पश्चात व्यसनमुक्तीचे महत्त्व सांगणार, असा प्रतिप्रश्न केला जात आहे.
महापालिकेच्या वतीने शहरात नाशिक अमरधाम, पंचवटी अमरधामसह एकूण ११ पेक्षा अधिक ठिकाणी अशाप्रकारे अंत्यसंस्काराची सोय करण्यात आली आहे. अर्थात, नाशिक आणि पंचवटी वगळता अन्य अमरधाममध्ये किती सुविधा दिल्या जातात हा विषय संशोधनाचा आहेच, परंतु अनेक ठिकाणी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनाच रॉकेल नसल्याने पेट्रोलपंपावरून डिझेल आणण्यास सांगितले जाते. त्यात सुधारणा करणे सोडून अशाप्रकारचा नवीन अर्ज नमुना अमरधाममधील कर्मचाºयांकडून भरून घेतला जाऊ लागला आहे.

Web Title:  Was the dead person drinking or smoking?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.