हेच आले शिवसेनेच्या अंगलट

By admin | Published: September 12, 2014 12:30 AM2014-09-12T00:30:59+5:302014-09-12T00:30:59+5:30

हेच आले शिवसेनेच्या अंगलट

That was the reverse of Shiv Sena | हेच आले शिवसेनेच्या अंगलट

हेच आले शिवसेनेच्या अंगलट

Next


नाशिक म्हणजे राजकीय पक्षांची प्रयोगशाळा बनली आहे. अडीच वर्षांपूर्वी महापालिकेत भाजपाने पारंपरिक सहकारी शिवसेनेशी युती टाळून मनसेला साथ देत सत्ता स्थापन केली. भाजपाचा हा एक प्रयोग मानला गेला. आगामी काळात भाजपा-मनसे हीच युती असेल किंवा मनसे-सेना-भाजपा अशी युती असेल असे या प्रयोगावरून भाकीत व्यक्त केले जात होते. भाजपाचा हा प्रयोग संपला; परंतु आता दुसरा राजकीय प्रयोग होण्याची सुरुवात झाली आहे. ती म्हणजे मनसे-कॉँग्रेस- राष्ट्रवादी अशी आघाडी होय. खरे तर आघाडीच्या दृष्टीने मनसेही शत्रुपक्षच. तथापि, अशी राजकीय अगतिकता का आली त्याचे एक कारण म्हणजे शिवसेनेने चालवलेला घोडेबाजार. गेल्या वर्षी माकप आणि जनराज्य आघाडीच्या एकेक नगरसेवकाला गळाला लावले. त्यानंतर आता मनसेच्या दोन नगरसेवकांना पळवले. पाठोपाठ कॉँग्रेसचे सहा नगरसेवकही सेनेला समर्थन देण्याची अटकळ बांधली जात आहे. परंतु राष्ट्रवादीचेही काही नगरसेवक सेनेच्या संपर्कात आहेत. खरे काय ते सभागृहात कळेल. परंतु या निवडणुकीत शिवसेनेने केलेला घोडेबाजार बेसुमार तर आहेच; परंतु सर्वच पक्षांना फोडल्याने हे सारेच दुखावून एकत्र आले आहेत. शिवसेनेत द्रव्यबळाचा साक्षात्कार देणारा प्रबळ उमेदवार आहे; परंतु तीच बाब शिवसेनेच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या घोडेबाजारमुळे नंतरच्या काळात भ्रष्टाचार वाढणार नाही का, असा प्रश्न कॉँग्रेस शहराध्यक्षांनी केला आहे. शिवसेनेचा उमेदवार हा अर्थकारण करण्यात पटाईत आहे. त्यामुळे अन्य उमेदवार असता तर कदाचित विरोधी पक्षांकडून विरोध झाला नसता, असेही त्यांनी सहज बोलताना सांगितले. उत्साह असावा मात्र अतिउत्साह, अति आत्मविश्वास कसा अडचणीत आणतो याचे हे उदाहरण आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत सेनेचा विजय झाला तर ठीकच आहे; अन्यथा परभव झाला तर त्याला अतिउत्साहच कारणीभूत असेल, हे मात्र नक्की.
- संजय पाठक

Web Title: That was the reverse of Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.