पुतळे हटविण्याचे काम जाणिवपूर्वक केले का? छगन भुजबळ यांचा थेट सवाल
By श्याम बागुल | Published: May 29, 2023 02:48 PM2023-05-29T14:48:12+5:302023-05-29T14:48:50+5:30
भुजबळ यांनी, असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही केली.
नाशिक : महाराष्ट्र सदनात जयंती साजरी करायला विरोध नाही. परंतु ज्याठिकाणी शिवराज मुद्रा लावली आहे ती झाकून सावरकर यांचा पुतळा लावला गेला. तिथेच छोट्या चौकात दोन पुतळे आहे त्यात राजमाता अहिल्याबाई आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला केले गेले. ही घटना जाणिवपूर्वक करण्यात आली काय, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.
नाशिक येथील कार्यालयात सोमवारी (दि.२९) सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भुजबळ यांनी, असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही केली. महाराष्ट्र सदनात मोठ्या हॉलची व्यवस्था असतांना जयंतीचा कार्यक्रम तेथे का घेण्यात आला नाही. या प्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे व पुतळे हटविण्याचे काम जाणीवपूर्वक केले का हे शोधले पाहिजे, अशी मागणी भुजबळ यांनी केली.