बळवंतनगर येथील  जलकुंभातून २४ तास धो धो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:44 AM2018-05-28T00:44:28+5:302018-05-28T00:45:12+5:30

नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन करणारे आणि प्रसंगी अपव्यय केला म्हणून दंड ठोकणाऱ्या महपालिकेच्या कारभाराबद्दलच शंका उपस्थित केली जात आहे. बळवंतनगर येथील जलकुंभाला अनेक वर्षांपासून गळती असून, त्यातून दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे चोवीस तास पाण्याची गळती असल्याने जलकुंभाला लागून असलेला नालाही प्रवाहित झाला आहे. एरवी या नाल्यात पावसाळ्यातच पाणी बघावयास मिळत असे. परंतु भर उन्हाळ्यात या नाल्यात पाणी वाहू लागले आहे.

 Wash the water for 24 hours in Balwantnagar | बळवंतनगर येथील  जलकुंभातून २४ तास धो धो

बळवंतनगर येथील  जलकुंभातून २४ तास धो धो

Next

नाशिक : नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन करणारे आणि प्रसंगी अपव्यय केला म्हणून दंड ठोकणाऱ्या महपालिकेच्या कारभाराबद्दलच शंका उपस्थित केली जात आहे. बळवंतनगर येथील जलकुंभाला अनेक वर्षांपासून गळती असून, त्यातून दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे चोवीस तास पाण्याची गळती असल्याने जलकुंभाला लागून असलेला नालाही प्रवाहित झाला आहे. एरवी या नाल्यात पावसाळ्यातच पाणी बघावयास मिळत असे. परंतु भर उन्हाळ्यात या नाल्यात पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ सांगणाºया पालिकेच्या गलथान कारभारावर काय कारवाई करायची असा प्रश्न परीसरातील नागरीक करीत आहेत. सदगुरूनगर- खांदवेनगरला लागून जाणाºया पाइपलाइन रस्त्यावर बळवंतनगर येथे २००७ मध्ये २० लाख लिटर पाणी क्षमता असलेला जलकुंभ बांधण्यात आला. या जलकुंभातून परिसरातील गणेशनगर, बळवंतनगर, सदगुरूनगर, खांदवेनगर, सोमेश्वर कॉलनी, सावरकरनगर, आनंदवल्ली यासह अन्य भागांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून या जलकुंभाला गळती लागली आहे. जलकुंभाला जोडण्यात आलेली मुख्य जलवाहिनीच छताजवळ चहूबाजूने लिकेज् असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. या जलकुंभातून २४ तास पाणीगळती होत असते. त्यामुळे जलकुंभाखाली भलेमोठे डबके साचले असून, त्याला तळ्याचे रूप प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर जलकुंभाजवळच असलेला नालाही या पाण्याने बारमाही प्रवाहित झाल्याचे चित्र आहे.स्थानिक जागरूक नागरिकांनी यासंदर्भात प्रशासनाला आणि स्थानिक नागरिकांना कळवूनही त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात असल्याने संबंधीत पाणीबचतीबाबत गंभीर आहे काय असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे.
प्रशासनाची अशीही शक्कल
या जलकुंभातून सातपूर आणि गंगापूर परिसरांतील बºयाचशा नगरांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या जलकुंभाचे बांधकाम हाती घेतल्यास नागरिकांना म्हणाव्या तेवढ्या वेगाने पाणीपुरवठा करता येणार नसल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले. एकूणच लाखो लिटर पाणी वाया गेले तरी चालेल पण पाणीपुरवठा खंडित होऊ नये, असा अजब विचार प्रशासनाकडून केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  सदरचा जलकुंभ २००७ साली बांधण्यात आला आहे. मात्र काही वर्षांतच त्यातून पाण्याची गळती होत असल्याने त्याच्या बांधकामाबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहे. एवढ्या कमी कालावधी जलकुंभाची अशाप्रकारे दशा झाल्याने बांधकामाच्या दर्जाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. मध्यंतरी महापालिकेने वॉटर आॅडिट केले, परंतु अशावेळीदेखील हा प्रकार आढळला नाही काय, असादेखील प्रश्न आहे.

Web Title:  Wash the water for 24 hours in Balwantnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.