पंचवटीत भूखंडावर कचऱ्याचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:33 AM2018-03-22T00:33:23+5:302018-03-22T00:33:23+5:30
परिसरातील मोकळ्या भूखंडावर कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. राज्यात प्लॅस्टिकबंदीचा निर्णय होऊनदेखील प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर कचरा विल्हेवाटीसाठी मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ सफाई करून कचरा टाकणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आडगाव : परिसरातील मोकळ्या भूखंडावर कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. राज्यात प्लॅस्टिकबंदीचा निर्णय होऊनदेखील प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर कचरा विल्हेवाटीसाठी मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ सफाई करून कचरा टाकणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या परिसरात अनियमित घंटागाडीमुळे नागरिक कचºयाची आजूबाजूच्या परिसरात विल्हेवाट लावतात. बळीराज जलकुंभ परिसर, शिक्षक कॉलनी, प्रेमदान हॉस्पिटल परिसरात प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये कचरा टाकतात. परिसरात कचºयाचे ढीग दिसून येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ सफाई करावी शिवाय कचरा टाकणाºयांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.