कचरा विलगीकरण, ५४ नागरिकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 01:03 AM2018-04-03T01:03:50+5:302018-04-03T01:03:50+5:30
महापालिकेने ओला व सुका कचरा स्वतंत्र करून न देणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू केली असून, दुसºया दिवशी ५४ नागरिक व व्यावसायिकांकडून ३९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, ओला-सुका कचरा स्वतंत्रपणे देणाºया नागरिकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले, तर नागरिकांचे प्रबोधनही करण्यात येत आहे.
नाशिक : महापालिकेने ओला व सुका कचरा स्वतंत्र करून न देणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू केली असून, दुसºया दिवशी ५४ नागरिक व व्यावसायिकांकडून ३९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, ओला-सुका कचरा स्वतंत्रपणे देणाºया नागरिकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले, तर नागरिकांचे प्रबोधनही करण्यात येत आहे. महापालिकेने घनकचरा विलगीकरणावर लक्ष केंद्रित केले असून, ओला व सुका कचरा स्वतंत्र न देणाºया नागरिकांना ५०० रुपये, तर व्यावसायिकांना दहा हजार रुपये दंड ठोठावला जात आहे. १ एप्रिलपासून महापालिकेने सदर कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार, पहिल्या दिवशी ८७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला होता. सोमवारी (दि.२) ५४ नागरिक व व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून ३९ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला. त्यात नाशिकरोड विभागात ११,५०० रुपये, सातपूर-२००० रुपये, सिडको-३००० रुपये, पूर्व विभागात ५००० रुपये, पंचवटी विभागात दहा हजार रुपये, तर पश्चिम विभागात ७,७०० रुपये दंडाचा समावेश आहे. याशिवाय, महापालिकेने प्लॅस्टिक बंदीचीही प्रभावी अंमलबजावणी केली जात असून, प्लॅस्टिकचा वापर करणाºया व्यावसायिकांविरुद्ध पश्चिम विभागात १५ हजार रुपये, नाशिकरोड विभागात पाच हजार, तर पूर्व विभागात पाच हजार रुपये याप्रमाणे एकूण २५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.