वटार : उत्तर महाराष्टÑातील नामवंत पहिलवानांची हजेरी चौंधाणे येथे रामगीरबाबा यात्रोत्सवात कुस्त्यांची दंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:10 AM2018-04-18T00:10:20+5:302018-04-18T00:10:20+5:30
वटार : येथे रामगीरबाबांनी संजीवन समाधी घेतली होती, त्या घटनेस उजाळा म्हणून गावकऱ्यांनी आजतागायत बाबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यात्रोत्सवाची परंपरा चालू ठेवली आहे.
वटार : येथे रामगीरबाबांनी संजीवन समाधी घेतली होती, त्या घटनेस उजाळा म्हणून गावकऱ्यांनी आजतागायत बाबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यात्रोत्सवाची परंपरा चालू ठेवली आहे. यात्रोत्सवात कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला. यात सात दिवस नामवंत कीर्तनकारांनी हजेरी लावली. यात सुप्रसिद्ध बालकीर्तनकार ऋषप्रभादेवी (वृंदावन) यांचे कीर्तन झाले. ग्रामस्थ, ग्रामपंचायत प्रशासन व सटाणा शहरातील वात्सल्य हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले. डॉ. राहुल सोनवणे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मनीषा सोनवणे व त्यांच्या सहकाºयांचा समावेश होता. सायंकाळी गावातून ग्रंथदिंडी व महंत रामगीरबाबा पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. दुसºया दिवशी प्रकाश मोरे यांच्याकडून महाप्रसाद देण्यात आला.
मालेगाव तालुक्यातील आघार येथील साईगिरणा दूध संस्था संचालक मल्ल संजय (बाबा) हिरे याने सलग कुस्त्या जिंकल्या. काही लढती अटीतटीच्या होऊन निर्णय लागू न शकल्याने दोघांना समसमान बक्षीस वाटून देण्यात आले. पुरुष गटात प्रवीण (लोहोणेर) व मार्तंड (मनमाड) यांच्यात कुस्ती झाली. त्यात मनमाडच्या मार्तंडने बाजी मारली. महिला गटात प्रतीक्षा (नांदगाव) व शिवानी (मनमाड) यांच्यात लढत झाली. त्यात मनमाडच्या शिवानीने ही लढत जिंकली. कुस्ती दंगलीसाठी शिवसेनेचे लालचंद सोनवणे, अनिल पाटील, रवि बिरारी, विठ्ठल बागुल, दिनकर खैरनार (वटार) यांचा समावेश होता. पंच म्हणून प्रदीप मोरे, लाला मोरे, दीपक मोरे, राजाराम पवार, रमेश बर्डे, बाळासाहेब पवार यांनी काम पाहिले, तर पवन मोरे व प्रशांत शेवाळे यांनी गुणलेखन केले. यावेळी कोमल खैरनार (कुस्ती), मोहिनी खैरनार (बॉक्सिंग), पवन मोरे, प्रशांत शेवाळे (मॅरेथॉन) या चौंधाणे येथील खेळाडूंना त्यांच्या जिल्हा व राज्यस्तरावरील प्राविण्याबद्दल गौरविण्यात आले.