वटार-पठावा रस्त्याची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:11 AM2021-07-19T04:11:07+5:302021-07-19T04:11:07+5:30
पावसाळ्यात या रस्त्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त होते. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या ...
पावसाळ्यात या रस्त्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त होते. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. बाहेरून येणारे वाहनधारक यांना या रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात घडतात. या रस्त्याच्या दोन्ही बाजूस काटेरी झुडपे आल्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. त्यातूनही अपघातांना निमंत्रण मिळत आहे. येथील काटेरी झुडपे हटवून रस्त्याचे काम करण्याची मागणी जोरण, किकवारी, कपालेश्वर, तळवाडे, पठावा व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
कोट..
बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील पठावा रस्ता, चौंधाणा फाटा ते पठावापर्यंत मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच पावसामुळे पूर्ण रस्ता खराब झाला आहे. बागलाण तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे. केवळ निवडणुकीत आश्वासने दिली जातात, नंतर मात्र त्यांना त्याचा विसर पडतो.
- सुभाष सावकार, ग्रामस्थ, जोरण
फोटो - १८ सटाणा रोड
सटाणा ते पठावा रस्त्यावर जोरण गावाजवळ पावसाचे पाणी साचून आलेले तलावाचे स्वरूप.
180721\18nsk_18_18072021_13.jpg
फोटो - १८ सटाणा रोड सटाणा ते पठावा रस्त्यावर जोरण गावाजवळ पावसाचे पाणी साचून आलेले तलावाचे स्वरूप.