साठेबाजीवर महसूलचा ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 11:27 PM2020-03-27T23:27:40+5:302020-03-27T23:28:02+5:30
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे अन्नधान्यासह किराणा मालाची साठेबाजी अथवा चढ्याभावाने विक्र ी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने पावले उचलली आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली असून, गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली.
सिन्नर :कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे अन्नधान्यासह किराणा मालाची साठेबाजी अथवा चढ्याभावाने विक्र ी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने पावले उचलली आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली असून, गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली.
तहसील कार्यालयात प्रांताधिकारी अर्चना पठारे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय केदार, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, वावीचे सहाय्यक निरीक्षक रणजित गलांडे, नायब तहसीलदार दत्ता जाधव आदींसह मंडळ अधिकारी उपस्थित होते. काही लोक संकटात गैरप्रकार करून संधी साधत असतात. त्यामुळे सामान्य नागरिकांची पिळवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मंडळ अधिकाऱ्यांनी अन्नधान्याची साठेबाजी व चढ्याभावाने होणारी विक्री यावर नजर ठेवावी, अशा सूचना प्रांताधिकारी पठारे यांनी केल्या. असे प्रकार आढळल्यास तत्काळ गुन्हे
दाखल करण्यात यावेत, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, पोलिसांनी अत्यावश्यक सेवा देणाºया वाहनांची अडवणूक करू नये, अशा सूचना पोलीस यंत्रणेला करण्यात आल्या. यावेळी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी परजिल्ह्यातून अथवा परदेशातून आलेल्या नागरिकांना होम क्वॉरण्टाइन होण्यास सांगितले आहे. असे नागरिक बाहेर फिरताना दिसल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन व साथरोग नियंत्रण कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात येतील, असे तहसीलदार कोताडे म्हणाले. मोठे कुटुंब असल्यास आयसोलेशनसाठी जिल्हा परिषद शाळांच्या खोल्या उपलब्ध करून देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.