दागिने चोरणाऱ्या वॉचमनला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 11:44 PM2019-05-29T23:44:04+5:302019-05-30T00:16:24+5:30
गंगापूर रोडवरील बळवंतनगर येथील हेरंब हाईट्स सोसायटीतील वॉचमनने सुमारे २ लाख ८५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरल्याची घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, संशयित आरोपी गंगा बाळाजी मुटकुळे यास अटक करून न्यायालयाने दि. २८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गंगापूर : गंगापूर रोडवरील बळवंतनगर येथील हेरंब हाईट्स सोसायटीतील वॉचमनने सुमारे २ लाख ८५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरल्याची घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, संशयित आरोपी गंगा बाळाजी मुटकुळे यास अटक करून न्यायालयाने दि. २८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बळवंतनगर येथील रागिणी सतीश चाळक (वय ४३, हेरंब हाईट, बळवंतनगर) यांनी या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत गंगापूर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, गंगापूर रोडवरील बळवंतनगर येथे हेरंब हाईट्स नावाची सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये गंगा बाळाजी मुटकुळे (३५) हा वॉचमन म्हणून काम पाहतो. मुटकुळे याने रागिणी चाळक यांच्या घरात प्रवेश करून ४३ ग्रॅम वजनाच्या १ लाख ६० हजार रु पये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, ५० हजार रु पये किमतीचे १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ४२ हजार रु पये किमतीचे ब्रेसलेट, ४ ग्रॅम वजनाच्या १२ हजार रु पये किमतीच्या सोन्याच्या रिंगा, ७ ग्रॅम वजनाची २१ हजार रु पये किमतीची सोन्याची अंगठी असे सुमारे २ लाख ८५ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात वॉचमन विरु द्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने २८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. आर. साबळे करीत आहेत.
नागरिक भयभीत
दरम्यान गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढणाºया गुन्ह्यांच्या घटनांनी सामान्य नागरिक भयभीत झाला असून, परिसरात पोलिसांची गस्त व चौकशी कमी झाली की काय असा सवाल सर्वसामान्यांतून उमटत आहे. परिसरातील बºयाच सोसायट्यांमध्ये वॉचमन नेमले जातात, मात्र त्याचे रेकॉर्ड गंगापूर पोलीस ठाण्यात सोसायट्या करीत नसल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.