सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून १८ गावांत पाणी : प्रमोद गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:12 AM2020-12-26T04:12:00+5:302020-12-26T04:12:00+5:30

विधायक उपक्रमाने बळ कुपोषण, शिक्षणासाठीही कार्य नाशिक : सोशल नेटवर्किंगचा उपयोग हा विधायक कामांसाठी होऊ शकतो, याच जाणिवेतून सुरू ...

Water in 18 villages through social networking: Pramod Gaikwad | सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून १८ गावांत पाणी : प्रमोद गायकवाड

सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून १८ गावांत पाणी : प्रमोद गायकवाड

Next

विधायक उपक्रमाने बळ

कुपोषण, शिक्षणासाठीही कार्य

नाशिक : सोशल नेटवर्किंगचा उपयोग हा विधायक कामांसाठी होऊ शकतो, याच जाणिवेतून सुरू झालेल्या चळवळीला चांगले यश लाभत आहे. वर्षानुवर्षे पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या १८ गावांना किमान पिण्यासाठी पाणी देऊन त्यांची समस्या दूर करण्यात या चळवळीला यश आले आहे, अशी माहिती संस्थेचे प्रमुख प्रमोद गायकवाड यांनी दिली.

प्रश्न- सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ गावात पाणी आल्यानंतरच जल्लोष झाल्याचा विषय व्हायरल झाला आहे. ही किमया कशी घडली?

गायकवाड- सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ हे गाव पाणीटंचाईमुळे अत्यंत अडचणीत होते. दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने त्याची दखल मीडियात घेतली जात होती. त्यामुळे सोशल नेटवर्किंग फोरमने गेले दीड वर्ष यासाठी परिश्रम घेतले आणि पाणीप्रश्न सेाडवला. या गावापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर वर्षभर पाणी असणारे धरण होते. त्याजवळच एक विहीर खोदली आणि तेथे खूप पाणी लागल्याने चर खेादून श्रमदानातून पाणी गावात आणले. काही सेवाभावी संस्थेच्या मदतीने पाण्याची टाकी बांधण्यात आली. त्यामुळे या गावााचा पाणीप्रश्न सुटला. आत्तापर्यंत १७ गावांत पाणी आणण्यात आले होते आणि हे अठरावे गाव होते.

प्रश्न - सोशल नेटवर्किंग फोरमची चळवळ कशी सुरू झाली?

गायकवाड - सोशल मीडियाचा वापर हा विधायक कामांसाठी झाला पाहिजे या उद्देशाने २०१० मध्येच सोशल नेटवर्किंग फोरम फॉर सोशल कॉज ही चळवळ सुरू केली. २०१२ मध्ये त्याला संस्थात्मक स्वरूप दिले. आरोग्य शिक्षण आणि पाणी यासंदर्भात तेव्हापासून लक्ष केंद्रित केले आहे.

प्रश्न- कुपोषणाबाबत संस्थेने काय काय उपक्रम राबवले?

गायकवाड- २०१७ मध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यात कुपोषणाची समस्या गंभीर झाल्याने एका गावात स्रीरोगतज्ज्ञ आणि बाल रोगतज्ज्ञांच्या मदतीने फोरमने काम केले. या ठिकाणी ३५२ कुपोषित मुले होती. त्यातील २८२ मुले कुपोषणाबाहेर आली. कुपोषण हे सरकारी पद्धतीने त्याच त्या पद्धतीचा पोषण आहार देऊन कमी होणार नाही तर त्यासाठी वेगळे काम केले पाहिजे यासाठी एक अहवाल करून केंद्र सरकारला सादर केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून वीस गावांतही कुपोषणमुक्तीसाठी काम सुरू आहे. याशिवाय डिजिटल शिक्षणासाठीदेखील दहा ते बारा गावांना संगणक आणि अन्य साहित्य पुरवले आहे. संगणक साक्षरतेसाठी मोहीमदेखील हाती घेण्यात आली.

Web Title: Water in 18 villages through social networking: Pramod Gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.