अवघ्या दोन दिवसांत ३८ हजार हेक्टरवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 01:35 AM2021-12-08T01:35:17+5:302021-12-08T01:35:43+5:30

नाशिक जिल्ह्यात १ आणि २ डिसेंबर या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे ३८ हजार ९२ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले तर कांदा आणि द्राक्ष पिकांनाही या अवकाळीचा फटका बसला आहे. सुमारे २३ हजार हेक्टरवरील कांदा पिकांचे नुकसान झाले असून द्राक्ष पिकांचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Water on 38,000 hectares in just two days | अवघ्या दोन दिवसांत ३८ हजार हेक्टरवर पाणी

अवघ्या दोन दिवसांत ३८ हजार हेक्टरवर पाणी

Next
ठळक मुद्देअवकाळीचा फटका : प्राथमिक अहवालानुसार कांद्याचे सर्वाधिक नुकसान

नाशिक : नाशिक जिल्ह्यात १ आणि २ डिसेंबर या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे ३८ हजार ९२ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले तर कांदा आणि द्राक्ष पिकांनाही या अवकाळीचा फटका बसला आहे. सुमारे २३ हजार हेक्टरवरील कांदा पिकांचे नुकसान झाले असून द्राक्ष पिकांचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्याला पुन्हा एकदा झोडपल्याने सलग दोन वर्षे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. निसर्गाची वक्रदृष्टी यंदाही नाशिक जिल्ह्यावर पडली आणि ऐन हिवाळ्यात झालेल्या पर्जन्यवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकाचे तसेच पशुधनाचे मेाठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यातील १०९७ गावांमधील शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान पाहण्याची वेळ आली. ५५ हजार ८९५ शेतकऱ्यांच्या कांदा, गहू, हरभरा, टोमॅटो, भाजीपाला तसेच आंबा, द्राक्ष आणि डाळिंबाचे नुकसान झाले.

कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने १ व २ डिसेंबरला अवकाळीचा पाऊस झाला. कोकण, मुंबईसह नाशकात अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपले. नाशिक जिल्ह्यात गारठ्याने ८७२ मेंढ्यांचा मृत्यू झाला तर गाय, वासरे व शेळ्या दगावल्याने मोठ्या प्रमाणात पशुधनाचे नुकसान झाले. भात, मका, भुईमुग, सोयाबीन, नागली, वरई, कांदा, हरभरा, गहू, टोमॅटो व भाजीपाला आडवा झाला. मालेगाव, सटाणा, नांदगाव या तालुक्यांमध्ये इतर तालुक्यांच्या तुलनेत जादा नुकसान झाल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. जिल्हा प्रशासनाने पंचनामे पूर्ण केले असून आर्थिक नुकसानभरपाईचा अहवाल शासनाला सादर केला आहे.

--इन्फो-

या पिकांना बसला सर्वाधिक फटका

या अवकाळी पावसामुळे द्राक्ष आणि कांदा पिकांना चांगलाच फटका बसला. जिल्ह्यातील १०,५९९.०५ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. या दोन दिवसांत कडाक्याची थंडी पडली, शिवाय पावसाची संततधार लागल्याने शेतकऱ्यांना द्राक्षे वाचविण्यासाठी औषध फवारणी करावी लागली. अनेक ठिकाणी तर बागेतील द्राक्षे गळून पडली तर तडेदेखील गेल्याने नुकसान झाले. कांदा पिकाच्या नुकसानीचे क्षेत्रदेखील माेठे आहे. अवकाळीमुळे २३,२४२.३० हेक्टरवरील कांदा पीक पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांना फटका बसला.

--इन्फो--

नुकसानीचे पीक क्षेत्र (हे.)

जिरायत - ७२८.९०

बागायत - २६६५३.३०

बहुवार्षिक फळपिके - १०७१०.६५

--इन्फो--

तालुका             नुकसानीचे क्षेत्र (हे.)

मालेगाव--------- ९२१

सटाणा ----------२८३७

नांदगाव---------२५५०

कळवण---------८२७.७०

देवळा----------७०.००

दिंडोरी---------२२६५.८०

सुरगाणा--------३१.८०

नाशिक---------१४२४.६०

त्र्यंबकेश्वर------२२८.१०

इगतपुरी----------२५३.००

पेठ--------------१८.००

निफाड-------------१३२८.००

सिन्नर-------------५९२.९५

येवला----------------५३.३०

चांदवड-------------२४६९१.६०

एकूण--------------३८०९२.८५

Web Title: Water on 38,000 hectares in just two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.