पाण्याचे एटीएम केंद्र बंद; रेल्वे प्रवाशांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 01:00 AM2018-06-30T01:00:59+5:302018-06-30T01:01:17+5:30
देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकावरील पाण्याचे एटीएम केंद्र बंद पडल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याकडे रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
देवळाली कॅम्प : देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकावरील पाण्याचे एटीएम केंद्र बंद पडल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याकडे रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. देवळाली रेल्वेस्थानकावर सहा महिन्यांपूर्वी पाण्याचे एटीएम मशीन लावण्यात आले होते. प्रारंभी काही काळ व्यवस्थित सुरू असलेले पाण्याचे एटीएम केंद्र हे बंद पडले आहे. कर्मचारी संख्या कमी असल्याने पाण्याचे एटीएम बंद पडल्याचे खासगीत बोलले जात आहे. देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकावर दररोज ४० पेक्षा अधिक रेल्वे थांबतात. शुद्ध पाण्याचे एटीएम बंद पडल्याने प्रवाशांना दोन्ही प्लॅटफॉर्मवरील पाणपोईवरून पाणी घ्यावे लागते. देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकावर लष्करी जवानांची रेल्वेने मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गरज लक्षात घेऊन बंद पडलेले पाण्याचे एटीएम त्वरित सुरू करावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.