शिरसगाव लौकी शाळेत ‘वॉटर बेल’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 02:42 PM2019-11-19T14:42:08+5:302019-11-19T14:42:29+5:30
पाटोदा : येथून जवळच असलेल्या शिरसगाव लौकी येथील जिल्हा परिषद शाळेत द्वितीय शैक्षणिक सत्राची सुरूवात आरोग्य विषयक चांगल्या बाबींची माहिती व्हावी व विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी शाळेत ‘वॉटर बेल’ हा उपक्र म सुरु करण्यात आला.
पाटोदा : येथून जवळच असलेल्या शिरसगाव लौकी येथील जिल्हा परिषद शाळेत द्वितीय शैक्षणिक सत्राची सुरूवात आरोग्य विषयक चांगल्या बाबींची माहिती व्हावी व विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी शाळेत ‘वॉटर बेल’ हा उपक्र म सुरु करण्यात आला. शाळेला सोशल मीडियाद्वारे या उपक्र माची माहिती मिळाली. केरळ राज्यात हा उपक्र म सर्व शाळेत सुरु आहे. आपण ही हा उपक्र म सुरु करूया अशी इच्छा शाळेतील सर्व शिक्षकांच्या मनात आली. विद्यार्थ्यांचे जीवन आरोग्यसंपन्न व्हावे या उद्दात्त हेतुने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शाळेतील शिक्षक हनुमंत काळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना पाणी मुबलक प्रमाणात का आवश्यक आहे? याविषयी माहिती दिली. शिक्षिका आशा पगारे यांनी कोणत्या वेळी ‘वॉटर बेल’ दिली जाईल व त्यावेळी सर्वांनी काय कृती करायची ही माहिती सांगितली. शिक्षक सूर्यभान पैठनकर यांनी पाण्याचे महत्व विषद केले तसेच पाणी म्हणजे जीवन यावर विविध प्रबोधनपर माहिती विद्यार्थ्यांना दिली. सर्व शिक्षक व मुख्याध्यापक शिसव यांच्या उपस्थितीत आकाशात फुगे सोडून सदर उपक्र म सुरु करण्यात आला.यावेळी संगीता बोडके, दादा वाघमोडे , अनिता गायकवाड, आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.