झाडे जगवण्यासाठी दुचाकीवरून पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 08:29 PM2020-04-22T20:29:07+5:302020-04-23T00:23:09+5:30
पाटोदा : येथील डोहवस्ती जिल्हा परिषद शाळेच्या आवारात विद्यार्थी-शिक्षकांनी उभारलेल्या झाडांबरोबरच तुळशीच्या झाडांच्या आॅक्सिजन बँकेला ग्रामस्थांच्या सहकार्याने जीवदान मिळाले आहे.
पाटोदा : येथील डोहवस्ती जिल्हा परिषद शाळेच्या आवारात विद्यार्थी-शिक्षकांनी उभारलेल्या झाडांबरोबरच तुळशीच्या झाडांच्या आॅक्सिजन बँकेला ग्रामस्थांच्या सहकार्याने जीवदान मिळाले आहे.
डोहवस्ती जिल्हा परिषद शाळेचे उपक्र मशील शिक्षक राजेंद्र वाघ यांनी तुळशीच्या झाडांची आॅक्सिजन बँक तयार केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन व संचारबंदीत शाळांनाही सुट्या जाहीर झाल्याने या आॅक्सिजन बँकेला पाणी घालण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक शाळेत येऊ शकत नव्हते. उन्हाचा कडाका वाढल्याने झाडे सुकायला लागले आहेत. नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक महेश शेटे यांच्या निदर्शनास ही बाब आली. वाघ यांच्याशी चर्चा करून शेटे यांनी पोलीसपाटील मुजमिल चौधरी, जाकीर मुलाणी, होमगार्ड कासार, ग्रामपंचायत लिपिक नंदू बोरसे, शिपाई दिगंबर बैरागी यांना पाण्याची गरज सांगितली. सर्वांनी एकत्र येऊन दुचाकीने मनमाड नगरपालिकेच्या बंधाऱ्यातून पाण्याच्या टाकीने पाणी भरून आणून या आॅक्सिजन बँकेला जीवदान दिले. कोरोना काळात तुळशीच्या झाडांना पाणी देऊन जगविण्याचा संकल्प यावेळी केला गेला.