कारसुळ नारायण टेंभीच्या पुलावरून पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 08:47 PM2019-11-06T20:47:56+5:302019-11-06T20:48:28+5:30
पिंपळगाव बसवंत : परिसरातील कारसुळ नारायण टेंंभी गावाच्या मधून वाहणाऱ्या काळजीनदी नदीवर अनेक वर्षापूर्वी पूल बांधण्यात आला. या पुलाची उंची कमी असल्याने थोड्याशा पावसातही पूल पाण्याखाली जातो. पावसाळ्यात नदीला कायम पाणी असल्याने ग्रामस्थांना पुलावरून जाणे धोक्याचे आहे.पावसाळ्यात या पुलावरून जाणे नागरिक टाळतात पण चार मिहन्यांचा पावसाळा संपूनही मुकाम ठोकल्या अवकाळीपावसामुळे या दोन्ही गावांचा संपर्क तुटलेला आहे.
पिंपळगाव बसवंत : परिसरातील कारसुळ नारायण टेंंभी गावाच्या मधून वाहणाऱ्या काळजीनदी नदीवर अनेक वर्षापूर्वी पूल बांधण्यात आला. या पुलाची उंची कमी असल्याने थोड्याशा पावसातही पूल पाण्याखाली जातो. पावसाळ्यात नदीला कायम पाणी असल्याने ग्रामस्थांना पुलावरून जाणे धोक्याचे आहे.पावसाळ्यात या पुलावरून जाणे नागरिक टाळतात पण चार मिहन्यांचा पावसाळा संपूनही मुकाम ठोकल्या अवकाळीपावसामुळे या दोन्ही गावांचा संपर्क तुटलेला आहे.
पुलावरून पाणी गेल्यास शेतक-यांना शेतात जाता येत नाही. विद्यार्थ्यांची शाळेला दांडी पडते तर अनेकांचा रोजगार बुडतो. पुलाची उंची वाढवण्यासाठी ग्रामस्थांनी वारंवार तक्र ारी करूनही त्याची योग्य दखल अद्याप घेण्यात आलेली नाही. पावसाळ्यात या पुलावरून ये-जा करणारी व प्रवासाचे प्रमुख माध्यम असलेली एसटी बस कारसुळ गावात येते पण पुलावरून पाणी असल्याने नारायण टेम्भी येथील गावकर्यांना बसची सेवाही खंडीत होते. या दोन्ही गावात पराशरी व काजळी या नद्यांचे संगम होऊन त्या तिसर्या कादवा नदीला मिळतात यामुळे तीन नद्यांचे संगम असलेले हे दोन्ही गावांमध्ये पावसाचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे या नद्यांना जलप्रवाहाला पावसात मोठा वेग असतो. मुसळधार पाऊस झाल्यास पुलावरून पाणी जाते. त्यामुळे पुलाशी जोडलेल्या या दोन्ही गावांचा संपर्क तुटतो.
काजळी नदीवरील हा पूल जुना आहे. मो-यांवर हा पूल बांधण्यात आला आहे. नदीच्या पाण्यातून केवळ पाच फूट उंचीवर हा पूल आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुलालगतच पाणी जाते. पुलाच्या टोकाजवळ रस्त्यावर नदीचे पाणी आल्याने रस्ता खड्डयÞांत गेला आहे. पूलही ठिकठिकाणी खचला आहे. माध्यमिक शाळा कारसुळ या गावी असल्याने नारायण टेम्भी येथील शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून शैक्षणकि नुकसान होऊ नये म्हणून या पुलावर जावे लागते .त्यामुळे पाणी वाढून कधीही मोठी हानी होईल , अशी भिती आहे. या बाबत नारायण टेंभी येथील सरपंच अजय गवळी यांनी वेळीवेळी ग्रामसभेत ठराव केला होता. व नवा पूल बांधून द्यावा, अशी मागणी केली होती. नारायण टेम्भी येथील शाळेत जाणार्या मुलांच्या ऊंच्या वाढल्या पण या दोन्ही गावांना जोडणार्या या नदीवरील पुलाची उंची काही वाढली नाही
मात्र संबंधित विभागांच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांनाचा जीव गेल्यावरच या विभागाला जाग येतेकी काय असा सवाल येथील नागरिक करीत आहे.
कोट....
आमदार खासदार यांना वेळोवेळी सांगूनही या नदीवरील पुलाची उंची वाढवण्यात आलेली नाही आजपर्यंत फक्त येथील विद्यार्थी ,ग्रामस्थ व शेतकर्यांना आश्वासन मिळाले पण आता नविनर्वाचित आमदारांकडू या दोन्ही गावांना जोडणार्या पुलाची उंची वाढेल अशी नकीच अपेक्षा आहे
- अजय गवळी,
नारायण टेम्भी सरपंच