जमिनीतून निघतायेत पाण्याचे बुडबुडे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 11:05 PM2019-07-13T23:05:55+5:302019-07-13T23:06:04+5:30

गोंदे, भायगाव, निरगुडे परिसरात वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याने घाबरलेल्या नागरिकांना दोन दिवसांपासून वेगळ्याच परिस्थितीला सामोरे जावे लागत

Water bubbles from the ground | जमिनीतून निघतायेत पाण्याचे बुडबुडे

जमिनीतून निघतायेत पाण्याचे बुडबुडे

Next

पेठ (नाशिक)- तालुक्यातील गोंदे, भायगाव, निरगुडे परिसरात वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याने घाबरलेल्या नागरिकांना दोन दिवसांपासून वेगळ्याच परिस्थितीला सामोरे जावे लागत असून, निरगुडे गावच्या तलावाच्या परिसरात कालपासून खडकातून पाण्याचे बुडबुडे बाहेर येताना दिसून येत आहेत.

दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर या भागात लहान-मोठे भूकंपसदृष्य धक्के बसत असल्याने आधीच घाबरलेल्या नागरिकांना दोन दिवसांपासून जमीन व खडकातून कोणता तरी वायुसदृष्य बाहेर येत असल्याने पाण्यावर बुडबुडे येताना स्पष्टपणे दिसत असल्याने भूगर्भात काहीतरी  हालचाली सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत तहसीलदार हरिष भामरे यांनी निरगुडे येथील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यासंदर्भात मेरी येथील भूगर्भ अभ्यासक विभागाला कळवण्यात आले असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Water bubbles from the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.