दापूर येथे युवा मित्र संस्थेकडून जलसाक्षता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 05:50 PM2018-12-13T17:50:35+5:302018-12-13T17:50:58+5:30

सिन्नर : तालुक्यातील लोणारवाडी येथील युवा मित्र या संस्थेच्या वतीने दापूर येथे शेतकऱ्यांसाठी जलसाक्षरता अभियान राबविण्यात आले. सुनील पोटे यांच्या मार्गदर्शनाने युवा मित्र संस्थेचे तालुका समन्वयक प्रीतम लोणारे यांनी ग्रामस्थांना जलसमृद्धी प्रकल्पाद्वारे गावचा विकास कसा करता येईल याबाबत माहिती दिली.

Water conservation campaign from Yoge Mitra Institute at Dapoor | दापूर येथे युवा मित्र संस्थेकडून जलसाक्षता अभियान

दापूर येथे युवा मित्र संस्थेकडून जलसाक्षता अभियान

Next

सिन्नर : तालुक्यातील लोणारवाडी येथील युवा मित्र या संस्थेच्या वतीने दापूर येथे शेतकऱ्यांसाठी जलसाक्षरता अभियान राबविण्यात आले. सुनील पोटे यांच्या मार्गदर्शनाने युवा मित्र संस्थेचे तालुका समन्वयक प्रीतम लोणारे यांनी ग्रामस्थांना जलसमृद्धी प्रकल्पाद्वारे गावचा विकास कसा करता येईल याबाबत माहिती दिली.
टाटा ट्रस्टच्या सहकार्याने प्रत्येक गावात जलसाक्षरता अभियानाद्वारे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्याचा प्रयत्न युवा मित्र या संस्थेकडून केला जात आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत गावातील नदी-नाले व पाझर तलाव यातील गाळ काढण्याची मोहीम राबवून भूजलपातळीत वाढ करण्यावर भर दिला जाणार असल्याचे लोणारे यांनी सांगितले. गावातील शेतकºयांनी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत मशीन मागणी अर्ज सादर करावयाचा आहे. सदरचा प्रकल्प युवामित्र, महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जाणार आहे. यासाठी संस्थेकडून यंत्रसामुग्री सरकारकडून इंधन खर्च दिला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. उपसलेला गाळ शेतकºयांना मोफत मिळणार असून तो त्यांनी स्वत:च्या वाहनाने त्यांच्या शेतात घेऊन जावा. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत नदी-नाले व पाझर तलाव खोली करणामुळे जलसाठ्यात वाढ होईल. युवा मित्र संस्थेचे गाळ काढणे हा काही व्यवसाय नाही तर या काढलेल्या जलस्त्रोतांचे नाला बंधारा यावर पुढे पाणी वापर संस्था स्थापन करणे व त्याचे नियोजन व व्यवस्थापन गावकºयांककडून करून घेणे हा मुख्य उद्देश असल्याचे तालुका समन्वयक लोणारे यांनी सांगितले.

Web Title: Water conservation campaign from Yoge Mitra Institute at Dapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी