आडवाडीत लोकसहभागातून केले जलसंवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 11:10 PM2020-07-12T23:10:28+5:302020-07-13T00:15:02+5:30
आडवाडी येथे युवामित्रच्या सहकार्यातून ग्रामविकास समिती व ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने गावातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या बंधाऱ्यातील १० हजार २७५ घनमीटर गाळ उपसण्यात आला. या कामामुळे बंधाºयातील जलसाठा १.०२८ कोटी लिटरने वाढणार असल्याने येथील पिण्याच्या तसेच सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
सिन्नर : तालुक्यातील आडवाडी येथे युवामित्रच्या सहकार्यातून ग्रामविकास समिती व ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने गावातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या बंधाऱ्यातील १० हजार २७५ घनमीटर गाळ उपसण्यात आला. या कामामुळे बंधाºयातील जलसाठा १.०२८ कोटी लिटरने वाढणार असल्याने येथील पिण्याच्या तसेच सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
आडवाडी गावातील तीन वाड्यांमध्ये १९१ कुटुंबे वास्तव्यास आहेत. तीनही वाड्यांना प्रत्येकी एक एक पाझर तलाव आहे. या पाझर तलावातही गाळ व दगड, गोटे साचले होते त्यामुळे बंधाºयाची पाणी साठवणक्षमता कमी झाली होती.
शेतकरी डोंगळे टाकून पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर करीत होते. युवामित्र गावात राबवत असलेल्या देवनदी पुनर्जीवन कार्यक्र मांतर्गत गावात अडूआई माता ग्रामविकास समिती तयार करण्यात आली आहे.
या समितीच्या मासिक बैठकीमध्ये सदस्यांकडून बंधाºयातील गाळ उपसा व गळतीचा प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा केली. गावकऱ्यांच्या माध्यमातून बंधाºयातील गाळ वाहून नेणे व भिंतीच्या पिचिंगसाठी १ लाख २० हजार रु पयांचा निधी जमा केला व युवामित्रने दि नेचर कॉन्झर्वन्सी इंडिया या संस्थेच्या मदतीने पोकलॅन मशीन व डिझेल उपलब्ध करून दिले. लोकसहभागातून झालेल्या या जलसंवर्धनामुळे गावातील तीनही वाड्यांतील ११९५ लोक व १२५० जनावरांचा पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होण्यास मदत होईल तसेच १५० एकरवरील भात पिकाला पाणी देता येईल. तसेच बंधाºयात केला जाणारा मासेमारी व्यवसाय लिलाव पद्धतीने दिल्याने त्याचा अतिरिक्त महसूल ग्रामपंचायतीला मिळेल. त्याचबरोबर गावाच्या खालच्या वाडीत ५ हेक्टर क्षेत्रावर सलग समतल चरचे काम सुरू आहे. त्याच्या माध्यमातून डोंगरउतारावरून वाहून जाणाºया मातीची धूप थांबेल व त्यावर वृृक्षारोपणातून वनराई फुलवण्याचा गावकºयांचा मानस आहे.
मे महिन्यात ग्रामस्थ व युवामित्र प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ करण्यात आला. बंधाºयात १६ दिवस पोकलॅन मशीनने गाळ उपसा केला. काढलेला गाळ २० शेतकºयांनी स्वखर्चाने ट्रॅक्टर व डंपरच्या साहाय्याने खडकाळ जमिनीवर टाकून एकर क्षेत्र पीक लागवडयोग्य केले व बंधाºयात वाहून आलेल्या दगडगोटे व शेतात टाकण्यास योग्य नसणारी माती वापरून दोन शेततळे आणि १० एकराची बांध बंदिस्ती केली. त्यामुळे येथील तीन वाड्यांतील रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटला आहे.