मासेमारी व्यावसायिकांचा जलसमाधीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 07:01 PM2018-12-07T19:01:59+5:302018-12-07T19:02:36+5:30

गिरणा धरणाच्या फुगवटा भागात स्थानिक मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांना ठेकेदार मज्जाव करीत असल्याच्या निषेधार्थ व धरणात स्थानिक आदिवासी व मच्छीमारांना मासेमारी करू द्यावी, कराराप्रमाणे ठेकेदाराने रोजगार उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी कुटुंबासह मासेमारी व्यावसायिकांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.

 Water conservation efforts of fishing professionals | मासेमारी व्यावसायिकांचा जलसमाधीचा प्रयत्न

गिरणा धरणात मासेमारी करू द्यावी, या मागणीसाठी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न करताना मासेमारी व्यावसायिक.

Next
ठळक मुद्देमालेगाव : कराराप्रमाणे रोजगार देण्याची मागणी

मालेगाव : गिरणा धरणाच्या फुगवटा भागात स्थानिक मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांना ठेकेदार मज्जाव करीत असल्याच्या निषेधार्थ व धरणात स्थानिक आदिवासी व मच्छीमारांना मासेमारी करू द्यावी, कराराप्रमाणे ठेकेदाराने रोजगार उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी कुटुंबासह मासेमारी व्यावसायिकांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.
महसूल व पोलीस प्रशासनाच्या अधिकाºयांनी मध्यस्थी केल्यानंतर व मत्स्य विभाग ठेकेदारावर कारवाईचा प्रस्ताव शासनाला सादर करेल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे, मत्स्य विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त सुजाता साळुंखे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. गिरणा धरणातील मासेमारीचा ठेका खासगी संस्थेने घेतला आहे.
परिणामी स्थानिक आदिवासी व मच्छीमारांना मासेमारी करू दिली जात नाही. त्यांच्यावर बेरोजगारीची कुºहाड कोसळून उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मासेमारी व्यावसायिकांनी शासनाच्या मत्स्य विभागाकडे याबाबत वारंवार तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही. संतप्त मासेमारी व्यावसायिकांनी शुक्रवारी तालुक्यातील विसापूर येथील गिरणा धरणाच्या फुगवटा भागात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. तहसीलदार देवरे, मत्स्य विभागाच्या साळुंखे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी आंदोलकांशी संवाद साधत मध्यस्थी केली. करारानुसार ठेकेदाराने रोजगार उपलब्ध करून दिला नसल्याची तक्रार आंदोलकांनी केली. यावर तहसीलदार देवरे यांनी संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव मत्स विभाग शासनाला सादर करेल असे आश्वासन दिले. यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलकात एकनाथ वाघ, संदीप शिवदे, सचिन शिवदे, संतोष सोनवणे यांचेसह विसापूर व रोंझाणे परिसरातील आदिवासी मच्छिमार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title:  Water conservation efforts of fishing professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.