सिन्नर येथे उद्यापासून ‘जलसंधारण ते मनसंधारण’ प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 05:48 PM2019-01-02T17:48:19+5:302019-01-02T17:48:46+5:30

पाणीटंचाईच्या संकटापासून राज्याची सुटका करण्यासाठी अभिनेता अमीर खान यांच्या पुढाकाराने आयोजीत करण्यात येत असललेल्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत यंदा सलग दुसऱ्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व चांदवड तालुक्याचा समवेश करण्यात आला आहे.

 'Water conservation from Manasandhana' exhibition from Sinnar on Thursday | सिन्नर येथे उद्यापासून ‘जलसंधारण ते मनसंधारण’ प्रदर्शन

सिन्नर येथे उद्यापासून ‘जलसंधारण ते मनसंधारण’ प्रदर्शन

Next

या पार्श्वभूमीवर पानी फाऊंडेशनचे नेमके काम, श्रमदानातून जलसंधारणाची कामे, स्पर्धेत सहभागी होणा-या गावांना काय करायचे आहे या संदर्भातील मार्गदशन करणारे प्रदर्शन शुक्रवार (दि.४) रोजी पंचायत समितीच्या सभागृहात भरणार आहे.सिन्नर पंचायत समितीच्या सभागृहात चालणारे प्रदर्शन शुक्रवार ते रविवार (दि. ६) पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. जलसंधारण ते मनसंधारण या प्रदर्शनातून तालुक्यातील जास्तीत जास्त गावे वॉटर कप स्पर्धेत सहभागी होतील असा आशावाद पानी फाऊंडेशनने व्यक्त केला आहे. शुक्रवारी (दि. ४) रोजी सकाळी १० वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे, उपसभापती जगन्नाथ भाबड यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

Web Title:  'Water conservation from Manasandhana' exhibition from Sinnar on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.