बाजार समितीतील पाणपोईची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:10 AM2017-08-23T00:10:25+5:302017-08-23T00:10:30+5:30
पेठरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील शरदश्चंद्र पवार बाजार समितीच्या आवारात फळबाजारातील व्यापारीवर्गाने वर्गणी जमा करून उभारलेली पाणपोई सध्या धूळखात पडून आहे. या पाणपोईचा वापरच होत नसल्याने पाणपोई उभारणीचा अट्टाहास कशासाठी केला होता, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
पंचवटी : पेठरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील शरदश्चंद्र पवार बाजार समितीच्या आवारात फळबाजारातील व्यापारीवर्गाने वर्गणी जमा करून उभारलेली पाणपोई सध्या धूळखात पडून आहे. या पाणपोईचा वापरच होत नसल्याने पाणपोई उभारणीचा अट्टाहास कशासाठी केला होता, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. शरदश्चंद्र पवार बाजार समितीत काही महिन्यांपूर्वी फळबाजारातील व्यापारीवर्गाने हमाल, मापारी तसेच शेतकºयांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाणपोई उभारली होती. पाणपोई उभारली खरी मात्र नळजोडणी केलेली नसल्याने पाणपोई असून, अडचण नसून खोळंबा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याच्या समस्या पाठोपाठ, रस्त्यावर पडलेले खड्डे, चिखलाचे साम्राज्य यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे.