नाशिककरांवर जलकपातीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:11 AM2021-07-12T04:11:11+5:302021-07-12T04:11:11+5:30
गेल्या शुक्रवारी (दि.९) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिकेला पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिला आहे. ...
गेल्या शुक्रवारी (दि.९) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिकेला पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर जलसंपदा विभागानेदेखील औपचारिक पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे सोमवारी (दि.१२) खातेप्रमुखांच्या बैठकीत त्यावर आयुक्त कैलास जाधव हे चर्चा करून प्रस्ताव तयार करण्याची शक्यता आहे.
इन्फो..
मुकणे धरणाने तारले !
दारणा धरणातून पाणी उपसा होत नसला तरी दोन वर्षांपूर्वी कार्यान्वित झालेल्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेने महापालिकेला मोठा हात दिला आहे. गंगापूर धरणातून दररोजचा वापर १३.९२ दशलक्षघनफुट इतका असून, मुकणे धरणातून ४.३८ दशलक्षघनफुट इतका वापर केला जात आहे.
इन्फो..
नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील शिल्लक साठा
धरण शिल्लक साठा (दलघफू)
गंगापूर १९१६
कश्यपी ३०९
गौतमी गोदावरी २२४
दारणा ३२४८
मुकणे १७४९