नाशिककरांवर जलकपातीचे संकट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:11 AM2021-07-12T04:11:12+5:302021-07-12T04:11:12+5:30

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पुरेसा साठा उपलब्ध नाही त्यातच दारणा धरणातून पाणी उचलणे बंद झाल्याने नाशिककरांवर ...

Water crisis on Nashik residents ... | नाशिककरांवर जलकपातीचे संकट...

नाशिककरांवर जलकपातीचे संकट...

Next

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पुरेसा साठा उपलब्ध नाही त्यातच दारणा धरणातून पाणी उचलणे बंद झाल्याने नाशिककरांवर जलसंकट उद्भवले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या सूचनेनंतर आता नाशिक महापालिकादेखील सतर्क झाली असून, येत्या एक ते दोन दिवसांत पाणी कपातीबाबत फैसला होणार आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी गेल्यावर्षी जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाने गंगापूर,दारणा आणि मुकणे धरणातून ५ हजार ५०० दश लक्ष घन फुट पाणी आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. मात्र, दारणा धरणातून नदीव्दारे आलेले पाणी चेहेडी बंधारा येथून उचलताना मलयुक्त पाण्यामुळे अडचणी येत आहे. त्यामुळे मुकणे धरणातून ४०० दश लक्ष घन फुट पैकी अवघे १७ दश लक्ष घन फुट पाणी उचलण्यात आले आहे. उर्वरीत ३८३ दश लक्ष घन फुट पाणी घेता न आल्याने नाशिककरोड भागासाठी गंगापूर धरणातून पाणी उचलले जात आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून नियमीत उपसा वाढला आहे. त्यातच पावसाने ओढ दिल्याने अडचण निर्माण झाली आहे. नाशिक महापालिकेला गंगापूर धरणातून ३ हजार ८०० दश लक्ष घन फुट पाणी आरक्षण देण्यात आले होते. त्यातील आता फक्त ५६.२७ दश लक्ष घन फुट पाणी शिल्लक आहे अर्थात धरणात साठा असल्याने आणखी साडे तीनशे दश लक्ष घन फुट पाणी उचलता येणे शक्य आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या अखेरीस पर्यंत तशी अडचण शक्य नाही. परंतु तरीही काळजी म्हणून पाणी जपून वापरावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या शुक्रवारी (दि.९) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिकेला पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर जलसंपदा विभागाने देखील औपचारीक पत्र व्यवहार केला आहे.त्यामुळे सोमवारी (दि.१२) खाते प्रमुखांच्या बैठकीत त्यावर आयुक्त कैलास जाधव हे चर्चा करून प्रस्ताव तयार करण्याची शक्यता आहे.

इन्फो..

मुकणे धरणाने तारले!

दारणा धरणातून पाणी उपसा होत नसला तरी दोन वर्षांपूर्वी कार्यान्वीत झालेल्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेने महापालिकेला मोठा हात दिला आहे. गंगापूर धरणातून दररोजचा वापर १३.९२ दश लक्ष घन फुट इतका असून मुकणे धरणातून ४.३८ दश लक्ष घन फुट इतका वापर केला जात आहे.

इन्फो..

नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील शिल्लक साठा

धरण शिल्लक साठा (दलघफू)

गंगापूर १९१६

कश्यपी ३०९

गौतमी गोदावरी २२४

दारणा ३२४८

मुकणे १७४९

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पुरेसा साठा उपलब्ध नाही त्यातच दारणा धरणातून पाणी उचलणे बंद झाल्याने नाशिककरांवर जलसंकट उद्भवले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या सूचनेनंतर आता नाशिक महापालिकादेखील सतर्क झाली असून येत्या एक ते दोन िदिवसांत पाणी कपातीबाबत फैसला होणार आहे.नाशिक शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी गेल्यावर्षी जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाने गंगापूर,दारणा आणि मुकणे धरणातून ५ हजार ५०० दश लक्ष घन फुट पाणी आरक्षण मंजुर करण्यात आले आहे. मात्र, दारणा धरणातून नदीव्दारे आलेले पाणी चेहेडी बंधारा येथून उचलताना मलयुक्त पाण्यामुळे अडचणी येत आहे. त्यामुळे मुकणे धरणातून ४०० दश लक्ष घन फुट पैकी अवघे १७ दश लक्ष घन फुट पाणी उचलण्यात आले आहे. उर्वरीत ३८३ दश लक्ष घन फुट पाणी घेता न आल्याने नाशिककरोड भागासाठी गंगापूर धरणातून पाणी उचलले जात आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून नियमीत उपसा वाढला आहे. त्यातच पावसाने ओढ दिल्याने अडचण निर्माण झाली आहे. नाशिक महापालिकेला गंगापूर धरणातून ३ हजार ८०० दश लक्ष घन फुट पाणी आरक्षण देण्यात आले होते. त्यातील आता फक्त ५६.२७ दश लक्ष घन फुट पाणी शिल्लक आहे अर्थात धरणात साठा असल्याने आणखी साडे तीनशे दश लक्ष घन फुट पाणी उचलता येणे शक्य आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या अखेरीस पर्यंत तशी अडचण शक्य नाही. परंतु तरीही काळजी म्हणून पाणी जपून वापरावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या शुक्रवारी (दि.९) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिकेला पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर जलसंपदा विभागाने देखील औपचारीक पत्र व्यवहार केला आहे.त्यामुळे सोमवारी (दि.१२) खाते प्रमुखांच्या बैठकीत त्यावर आयुक्त कैलास जाधव हे चर्चा करून प्रस्ताव तयार करण्याची शक्यता आहे.

इन्फो..

मुकणे धरणाने तारले!

दारणा धरणातून पाणी उपसा होत नसला तरी दोन वर्षांपूर्वी कार्यान्वीत झालेल्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेने महापालिकेला मोठा हात दिला आहे. गंगापूर धरणातून दररोजचा वापर १३.९२ दश लक्ष घन फुट इतका असून मुकणे धरणातून ४.३८ दश लक्ष घन फुट इतका वापर केला जात आहे.

इन्फो..

नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील शिल्लक साठा

धरण शिल्लक साठा (दलघफू)

गंगापूर १९१६

कश्यपी ३०९

गौतमी गोदावरी २२४

दारणा ३२४८

मुकणे १७४९

Web Title: Water crisis on Nashik residents ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.