माणिकपुंज धरणातून पाणी उपसा

By admin | Published: November 28, 2015 11:07 PM2015-11-28T23:07:09+5:302015-11-28T23:08:06+5:30

माणिकपुंज धरणातून पाणी उपसा

Water from the dam water tank | माणिकपुंज धरणातून पाणी उपसा

माणिकपुंज धरणातून पाणी उपसा

Next

न्यायडोंगरी : लाभार्थी गावातील नागरिकांचा आरोपन्यायडोंगरी : संपूर्ण महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्यावरून संघर्ष सुरू असून नांदगाव तालुक्यातही माणिकपुंज धरणाच्या पाणी आरक्षणाच्या मुद्यावरून रणकंदन सुरू असताना अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने पाणी उपसा केला जात असल्याचा आरोप लाभार्थी गावांकडून होत आहे.
याबाबत अधिकाऱ्यांनी वेळीच पायबंद न घातल्यास यापुढे हा संघर्ष अधिकारी विरुद्ध लाभार्थी गावातील नागरिक असा निर्माण होणार आहे. परिसरात विद्युत पंपाद्वारे पाणी उपसा करून त्याचा शेतीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचे चित्र आहे.
याबाबत तालुक्याचे तहसीलदार गट विकास अधिकारी व विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता विद्युत पुरवठा खंडित करण्यात येऊन असा अवैध पाणी उपसा पूर्णत: बंद केला असल्याचा दावा या विभागाने केला आहे. याबाबत लाभार्थी गावातील नागरिकांनी वीजवितरण कंपनीच्या सहायक अभियंत्यास निवेदन दिले आहे. मुख्य प्रवाहाच्या विद्युत तारा काढून घ्याव्यात तरच हे थांबणार आहे. निवेदनावर शिवाजी सरोदे, प्रताप गरूड, शिवराम कांदळकर, उदय पवार, बाळासाहेब वाघ, शिवाजी बच्छाव आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: Water from the dam water tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.