दारणा धरणातून पाणी विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:58 AM2019-04-22T00:58:48+5:302019-04-22T00:59:02+5:30
लहवित, भगूर, देवळाली कॅम्पसह नाशिकरोड, चेहेडी परिसरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होण्याने पाणीवापर संस्थांनी नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडे दारणा धरणातून पाणी रोटेशन विसर्ग करण्याची मागणी केली होती.
भगूर : लहवित, भगूर, देवळाली कॅम्पसह नाशिकरोड, चेहेडी परिसरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होण्याने पाणीवापर संस्थांनी नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडे दारणा धरणातून पाणी रोटेशन विसर्ग करण्याची मागणी केली होती. मात्र भरारीपथक नियुक्त करून शेतकऱ्यांच्या पंपमोटारी काढण्याची ताकीद देऊन तेव्हाच पाणी सोडण्याची इशारा दिला. तशी ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच रविवारी दुपारी पाणी सोडले व चेहेडी बंधारा भरल्यानंतर बंद करण्याचा आदेश दिला. त्यामुळे १५ दिवसांचे संकट टळले आहे.
भगूर नदी एमईएस लष्करी बंधारा ते नाशिकरोडचा चेहडीबंधारा कोरडाठाक पडला होता. परिसरातील शहर गावाना एक दिवस मिळेल ऐवढेच पाणी राहिले होते. त्यावेळी लष्करी छावणी परिषद, भगूर, सिन्नर नगर परिषद औद्योगिक विकास मंडळ यांच्या पाणी रोटेशन मागणीनुसार जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन फक्त पिण्याच्या पाण्यासाठी असल्याने भरारी पथक नेमले़ प्रथम सर्व शेतकऱ्यांच्या पंप मोटारी जप्त करा, तरच पाणी विसर्ग केला जाईल, असा सक्त आदेश दिला. भरारीपथकाने ५९ पंपमोटारी जप्त केल्या, तरीही पाणी विसर्ग होईना मात्र लोकमतमध्ये बातमी प्रसिद्ध होताच दखल घेऊन जलसंपदा उपविभागीय अभियंता पी. एम. कुलकर्णी, पी. एस. शेख, रवींद्र संसारे, वाणीयांच्यासह विविध अधिकारी यांनी दारणा नदीच्या काठावर बैठक घेऊन पोलीस संरक्षण मागणी चर्चा करून लष्करी अधिकारी यांनी जवान सोबत देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार पाणीचोरी होऊ देणार नाही, असे आश्वासन जिल्हाधिकारी यांना दिल्याने नंतर जलसंपदा विभागाने भगूर त चेहेडी बंधारा भरेल ऐवढेच पाणी सोडले. त्यामुळे तूर्तास पाणीटंचाई दूर झाली आहे़
दरम्यान, लहवित, बाजिगरा, भगूर ते नाशिकरोड, चेहेडी बंधारा परीसर काठावरील ४०० शेतकºयांच्या मोटारी पंप आहे आणि पिण्याच्या पाण्यापेक्षा हेच शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीसाठी पाणी उचलतात त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत पाणी समस्या निर्माण होते करीता जलसंपदा पाणीवापर संस्था अधिकारी यांचे भरारी पथकसोबत वीजकामगार व लष्करी जवान यांनी ४०० शेतकरी यांना प्रत्यक्ष भेटून पाणीचोरी रोखण्याचा दि.३१ जुलैपर्यंत प्रयत्न करू नये, असा सक्त तोंडी आदेश दिला आणि गस्त चालू ठेवली आहे.
पाणीचोरी केल्यास गुन्हे दाखल
बेकायदेशीर पाणीचोरीचा प्रयत्न केला तर त्या शेतकºयांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकºयांना याबाबत काळजी घ्यावी लागणार आहे़
कोटेकोर अंमलबजावणी झाली तर निदान परिसरातील नागरिकांना १५ दिवस पाणी मिळेल. जर शेतकºयांनी पाणी चोरले तर नागरिकांना पिण्यासाठी फक्त पाच दिवस पुरेल नंतर रोटेशन पाणी मिळणे अशक्य होण्याची शक्यता असल्याचे समजते. शेतकरी बांधवांनी दुष्काळी परिस्थिती पाहून पाणीचोरी करू नये, असे आवाहन भरारी पथकाने केले आहे.