सटाणा न्यायालयात जल दिनानिमित्त शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:10 AM2021-03-30T04:10:34+5:302021-03-30T04:10:34+5:30

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती विक्रम आव्हाड तर प्रमुख वक्ते म्हणून सहन्यायमूर्ती ए.जी. तांबोळी व सटाणा न्यायालयाचे कर्मचारी हेमंत ...

Water Day Camp at Satana Court | सटाणा न्यायालयात जल दिनानिमित्त शिबिर

सटाणा न्यायालयात जल दिनानिमित्त शिबिर

Next

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती विक्रम आव्हाड तर प्रमुख वक्ते म्हणून सहन्यायमूर्ती ए.जी. तांबोळी व सटाणा न्यायालयाचे कर्मचारी हेमंत अशोक देवरे उपस्थित होते. या शिबिरात तांबोळी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ३५७ मधील तरतुदी व मनोधैर्य योजना पीडितांना नुकसानभरपाई या विषयांवर विशेष मार्गदर्शन केले.

तसेच सटाणा न्यायालयात कर्मचारी हेमंत देवरे यांनी जागतिक जल दिनाच्या निमित्ताने दैनंदिन जीवनातील पाण्याचे महत्त्व सर्वांना पटवून दिले. पाण्याचे दुर्भिक्ष बघता सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून पाण्याचे जलसंधारण करणे गरजेचे असल्याचे सांगून पाणी वाचवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले. न्यायमूर्ती आव्हाड यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ५१ क अन्वये नद्या, नाले, सरोवरे यांचे जतन व संवर्धन करणे, त्याची निगा राखणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे याची जाणीव करून दिली. तसेच प्रत्येक नागरिकाला शुद्ध हवा व पाणी मिळण्याचा मूलभूत अधिकार आहे यावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सार्थक कुलकर्णी यांनी केले. सदर कार्यक्रमास सटाणा न्यायालयातील पक्षकार व कर्मचारी उपस्थित होते.

===Photopath===

290321\29nsk_10_29032021_13.jpg

===Caption===

सटाणा न्यायालयात आयोजित जलदिन कार्यक्रमात बोलताना  न्यायमूर्ती विक्रम आव्हाड. समवेत सह न्यायमूर्ती ए. जी. तांबोळीर.

Web Title: Water Day Camp at Satana Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.